कल्याण – कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागात राहणारी अल्पवयीन मुलगी सोमवारी संध्याकाळी चार वाजता घरातून बाहेर पडली होती. कोळसेवाडी भागात राहणाऱ्या विशाल गवळीची या अल्पवयीन मुलीवर नजर पडली. त्यांनी तिला फूस लावून स्वताच्या घरी आणले. तिथे तिच्यावर अत्याचार केले. हा प्रकार कोणाला कळू नये म्हणून राहत्या घरातच तिची हत्या केल्याची माहिती पोलीस तपासात उघडकीला आली आहे.

विशाल गवळीची पत्नी साक्षीने घरात घडलेला सर्व घटनाक्रम पोलिसांनी केलेल्या चौकशीत कथन केला. विशाल गवळी कल्याण पूर्वेत कोळसेवाडी भागात राहतो. विशालने संध्याकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान मुलीला फूस लावून आपल्या घरी आणले. तिच्यावर अत्याचार केले. या मुलीने आपण केलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला तर आपली नाचक्की होईल. विशालने तिची हत्या केली. मुलीची हत्या केल्यानंतर विशालने तिचा मृतदेह घरातील एका बॅगेत भरून ठेवला. मुलीची हत्या केल्यानंतर विशाल घरात थांबून होता.

विशालची पत्नी साक्षी बँकेत नोकरी करते. ती संध्याकाळी सात वाजता घरी आली. विशालने तिला घरात घडलेली घटना सांगितली. विशालने पत्नी साक्षीच्या साहाय्याने रात्रीच्या वेळेत घरातील मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखली. घरात पडलेले रक्त दोघांनी साफ केले. तोपर्यंत रात्रीचे साठे आठ वाजले होते. विशालने आपला मित्र असलेल्या रिक्षा चालकाला घरी बोलवले. मृतदेह असलेली बॅग रिक्षेत ठेवण्यात आली. पत्रीपूल मार्ग आधारवाडी, गांधारी पुलावरून विशाल, साक्षी आणि रिक्षा चालक मृतदेह असलेली पिशवी घेऊन भिवंडी पडघा दिशेने निघाले. बापगाव भागात अंधार तेथे कोणीही आजुबाजुला नाही. वाहनांची वर्दळ नाही पाहून विशालने मृतदेह बापगाव कबरस्तान भागातील जंगली झुडपे असलेल्या भागात फेकला. तेथून ते तातडीने निघाले.

हेही वाचा >>>उल्हासनगरमध्ये ४६ अनधिकृत नळ जोडण्या तोडल्या; पुन्हा अनधिकृत जोडणी केल्या गुन्हेही दाखल होणार, पालिकेचा इशारा

विशालने आधारवाडी चौकातील एका दुकानातून मद्याची बाटली खरेदी केली. तेथून तो तात्काळ आपल्या पत्नीचे माहेर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील गावी निघून गेला. पत्नी साक्षीला रिक्षा चालकाने घरी सोडले. कोणालाही या प्रकरणाचा संशय येऊ नये म्हणून साक्षीने कल्याणमधील घरीच राहणे पसंत केले. विशालच्या घराच्या बाहेर रक्ताचे डाग पडले होते. सीसीटीव्ही यंत्रणेने विशालला टिपले होते. विशालचा माग काढताच पोलिसांना त्याचा घराबाहेर रक्ताचे डाग आढळले. पोलिसांचा संशय बळावला. या प्रकरणाचा पोलिसांनी नंतर झटपट उलगडा करून विशाल, पत्नी साक्षीला, रिक्षा चालक यांचा सीसीटीव्ही चित्रणाव्दारे माग काढून त्यांना अटक केली.

या मुलीचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर याप्रकरणातील गुन्ह्यात आम्ही लैंगिक अत्याचाराचे कलम नोंद करणार आहोत, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader