भाईंदर : मीरा रोड येथील एका चौकाला देण्यात आलेले टिपू सुलतान हे नाव बदल्याची मागणी विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या दिवसात शहरातील वातावरण पेटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मीरा रोड येथे नया नगर नावाचा एक परिसर आहे.या भागातील एका चौकाचे २०१६ रोजी ‘हजरत टिपू सुलतान चौक’ असे नामकरण करण्यात आले होते. या बाबतचे नामफलक स्थानिक नगर सेवक नरेश पाटील यांच्या निधीतून लावण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र आता सात वर्षानंतर हे नाव बदल्याची मागणी विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे.याबाबत त्यांनी स्थानिक मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्ताना पत्र व्यवहार केला आहे.यात येत्या १० दिवसात हे नामफलक न बदल्यास बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांमार्फत  आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.तसेच त्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यास पालिका प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.त्यामुळे येत्या दिवसात टिपू सुलतानच्या नावाने भविष्यात मीरा भाईंदरचे वातावरण पेटणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishwa hindu parishad protest at tipu sultan chowk at mira road ysh
Show comments