किशोर कोकणे

ठाणे : कळवा, विटावा आणि दिघा भागातील रहिवाशांना पायी ठाणे रेल्वे स्थानक गाठता यावे यासाठी खाडीवर विटावा ते चेंदणी कोळीवाडा असा पादचारी पुल तयार करण्यात आला आहे. या पादचारी पुलामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत असून विटावा येथून अवघ्या पाच ते सात मिनीटांत ठाणे स्थानक गाठता येऊ लागले आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रवास खर्च, वाहतुक कोंडीतून सुटका झाली आहे. दररोज शेकडो नागरिक या पादचारी पुलाचा वापर करत आहेत. पूर्वी पादचारी पूल नसल्याने अनेकांना विटावा-ठाणे दरम्यान रेल्वे रूळांवरून चालत जाताना जीव गमवावा लागला होता.

maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
apmc premises free from traffic jams due to measures taken by the traffic police
एपीएमसी परिसर वाहतूक कोंडीमुक्त; वाहतूक पोलिसांच्या उपाययोजनांमुळे नागरिकांना दिलासा
kharghar to turbhe link road work will start after maharashtra assembly election 2024
खारघर तूर्भे लिंकरोडचे काम निवडणूकीनंतर सूरु होणार
western railway recovers 80 crore fine from ticketless passengers
विनातिकीट प्रवाशांकडून ८० कोटींची दंडवसुली; सात महिन्यांतील पश्चिम रेल्वेची कारवाई
Thane Passengers loot rickshaw, Thane rickshaw meter, Thane, rickshaw meter,
ठाणे : रिक्षाच्या मीटरमध्ये फेरफार करून प्रवाशांची लूट
Unauthorized parking lots, dhabas, Dronagiri,
उरण : द्रोणागिरी, पुष्पकनगरमध्ये अनधिकृत वाहनतळ, ढाबे

कळवा, विटावा आणि दिघा भागात मोठ्याप्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. ठाणे आणि कळवा विटावा या दोन भागांमधून ठाणे खाडी जाते. येथील नागरिकांना ठाणे स्थानकात येण्यासाठी वळसा घालून २० ते २५ मिनीटांचा प्रवास करावा लागत होता. अनेकदा वाहतुक कोंडीमुळे प्रवाशांचा अधिक वेळ वाया जातो. वाहतुक कोंडी टाळण्यासाठी काही नागरिक रेल्वे रूळांवरून चालत विटावा येथून ठाणे स्थानक गाठत होते. त्यामुळे रेल्वे गाड्यांच्या धडकेत अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. तर काहीजणांना कायमचे अपंगत्व आले. ठाण्याला जोडण्यासाठी विटावा ते ठाणे हा पादचारी पुल उभारण्यात यावा अशी मागणी केली जात होती. नागरिकांचे अपघातात प्राण जात असल्याने या पुलाच्या कामाला २०१४ मध्ये मान्यता मिळाली होती. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) २० एप्रिल २०१७ मध्ये प्रत्यक्ष कामास सुरूवात झाली. दोन वर्षांत हा पूल बांधून पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु करोना तसेच अनेक तांत्रिक कामांमुळे या पुलाच्या कामास अडचणी येत होत्या. मे २०२३ मध्ये पादचारी पूलाची कामे पूर्ण झाली. यासाठी एकूण २४ कोटी ५५ लाख रुपये इतका खर्च होता.

आणखी वाचा-ठाण्यात दसऱ्यानिमित्त सवलतींचा वर्षाव

पूल बांधून पुर्ण झाला असल्याने लोकार्पणाची वाट पाहणे टाळत नागरिकांनी पुलाचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. त्याचा परिणाम आता दिसून येत आहे. दिघा, विटावा आणि कळवा येथील पश्चिमेकडील भागातील नागरिक या पूलाचा वापर करू लागले आहेत. विटावा ते ठाणे गाठण्यासाठी शेअरिंग रिक्षाचे प्रतिप्रवासी २० रुपये मोजावे लागत होते. तसेच विटावा ते चेंदणीकोळीवाडा प्रवासासाठी २० ते २५ मिनीटे वाया जात होती. पुल झाल्याने अनेकांचा हा प्रवास खर्च वाचला आहे. तसेच वेळेची बचत होऊन पाच ते सात मिनीटांत चेंदणी कोळीवाडा गाठता येणे शक्य होत आहे.

मागील अनेक वर्षांपासून हा प्रकल्प पूर्ण झाला नव्हता. त्यामुळे वाहतुक कोंडीतून प्रवास करताना नागरिकांचे प्रचंड हाल होत होते. हा प्रकल्प झाल्याने आता ठाणे गाठण्यासाठी केवळ पाच मिनीटे लागत आहे. -नूतन जांभेकर, विटावा.