कल्याण– विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात बुधवारी संध्याकाळी एका महिलेची एका तरुणाने छेड काढली. याप्रकरणी महिलेच्या पतीने संबंधित तरुणाला पत्नीची छेड का काढली, असा प्रश्न केला. यावरुन दोघांच्यात बाचाबाची आणि त्यामधून हाणामारी झाली.गस्तीवरील लोहमार्ग पोलिसांना हा प्रकार समजताच पोलीस तात्काळ घटनास्थळी आले. त्यांनी रोहित गायकवाड या तरुणाला अटक केली. उल्हासनगर येथे राहणाऱी एक महिला आपल्या पतीसोबत डोंबिवली येथे येण्यासाठी निघाली होती. विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात बुधवारी संध्याकाळी ते आले. डोंबिवली स्थानकाकडे जाणाऱ्या लोकलची वाट पाहत ते विठ्ठलवाडी स्थानकात उभे होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महिलेचा पती स्थानकातील खाऊच्या दुकानात पाण्याची बाटली आणण्यासाठी गेला. महिला एकटीच उभी असल्याचे पाहून आरोपी रोहित गायकवाड तेथे आला. त्याने महिलेला पाहून ‘तू माझा मोबाईल ब्लाॅक का केला आहेस’, असा प्रश्न करुन त्या महिलेशी हुज्जत घातली. महिलेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले तरी रोहित तिच्याशी वाद उकरून काढत होता. तेवढ्यात महिलेचा पती तेथे आला. त्याने घडल्या प्रकाराची माहिती पत्नीकडून घेतली. रोहितला तू असे विचारणारा कोण असा प्रश्न केला. यावरुन महिलेचा पती आणि आरोपी रोहित यांच्या शाब्दिक बाचाबाची झाली. या वादातून दोघांमध्ये विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात तुफान हाणामारी झाली. रेल्वे पोलिसांना हा प्रकार समजताच पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी रोहितला ताब्यात घेतले. महिलेच्या तक्रारीवरुन कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे याप्रकरणाचा तपास करत आहेत.