रमेश पाटील/नीरज राऊत
कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश; भौगोलिक मानांकनासाठी पुढाकार
वाडा कोलमच्या नावाने मुंबई बाजारपेठेसह अन्य ठिकाणी परराज्यातील बनावट वाडा कोलम तांदळाची विक्री होत असल्याप्रकरणी संबंधित विभागाला चौकशी करून आवहाल सादर करण्याचे आदेश कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.
दरम्यान, वाडय़ातील शेतकऱ्यांना त्यांच्या विशिष्ट कोलम जातीच्या भाताला चांगला दर मिळावा, तसेच वाडा कोलमच्या नावाने सर्वसामान्य ग्राहकाची होणारी फसवणूक थांबावी यासाठी वाडय़ातील कोलम जातीच्या भाताला भौगोलिक मानांकन अर्थात ‘जिऑलॉजिकल आयडेंटिफिकेशन’ मिळावे म्हणून हालचाली सुरू झाल्या आहेत. याकरिता शासकीय पातळीवर बैठका घेण्यात येत असून या प्रक्रियेत वाडय़ातील शेतकरी तसेच इतर कृषी उद्य्ोगाशी संबंधित संस्थांना सहभागी करून घेतले जाणार आहे.
पालघर जिल्ह्य़ातील वाडा तालुक्यात पिकणारा कोलम या तांदळाच्या नावे आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक या राज्यात तयार होणारा बनावट वाडा कोलमची विक्री मुंबई तसेच परदेशातील बाजारपेठेत विक्री केली जात असल्याबद्दल लातुरचे आमदार अमित देशमुख यांनी विधिमंडळात प्रश्न विचारला होता. या बाबत कृषी विभागाकडे याबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झाल्या नसल्याचे कृषिमंत्र्यांनी सभागृहात सांगितले होते. वाडा कोलम तांदळाच्या जातीचे हेक्टरी उत्पन्न आणि उत्पादकता अत्यंत कमी असल्याने अधिक उत्पन्न देणाऱ्या भाताच्या नवीन सुधारित आणि संकरित जाती शेतकऱ्यांना उपलब्ध झाल्यामुळे वाडा कोलम जातीच्या लागवडीकडे शेतकरी दुरावल्याचे स्पष्टीकरण कृषिमंत्र्यांनी सभागृहात दिले. या संपूर्ण प्रकरणात कृषिमंत्र्यांनी संबंधित विभागाला चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
वाडा कोलमच्या नावाने बाजारात सर्वसामान्य ग्राहकांना लुबाडले जात असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाले होते. चांगल्या प्रतीच्या तांदळाचे उत्पन्न घेतल्यानंतरदेखील वाडय़ातील शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला मिळत नसल्याचे पुढे आले. ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवावी व नैसर्गिक वातावरणात टिकवल्या जाणाऱ्या ‘घुडय़ा’ आणि ‘कोलपी’ या दोन नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या भाताच्या जातींना संजीवनी देऊन वाडय़ात पिकवला जाणारा ‘सुरती’ आणि ‘झिनी’ तांदळाला ‘वाडा कोलम’ या नावाने भौगोलिक नामांकन मिळावे यासाठी पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या पुढाकाराने वाडय़ातील शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली.
वाडा परिसरात जुन्या जातीचे तांदळाचे बियाणे सुरक्षित ठेवावे, त्याचप्रमाणे बाजारामध्ये उपलब्ध सुरती व झिनी या दोन प्रकारचे तांदूळ शेतकऱ्यांनी बाजारात विकू नये, असे या बैठकीत ठरविण्यात आले. वाडा कोलमचा प्रवास हा १९४३ साली लागवड करणारे कै. पद्म बुधाजी पाटील यांच्यासह १९६०च्या सुमारास सुधारित वाणांची लागवड करणारे डॉ. चॅटर्जी व डॉ. दासगुप्ता यांनी त्या काळी तमिळनाडूमधून आणलेल्या भाताच्या प्रकाराची लागवड केली. त्याचा सर्व प्रयोगाचा अभ्यास व त्या प्रक्रियेत झालेले संशोधन याचा अभ्यास करण्यासाठी वाडय़ातील काही शेतकरी पुढे आले आहेत. वाडा कोलम या सेंद्रिय जातीचे हेक्टरी उत्पादन व उत्पादकता सुमारे सात ते आठ क्िंवटल प्रति एकर इतकीच असल्याने अधिक उत्पन्न देणाऱ्या भाताच्या नवीन सुधारित व संकरित जाती उपलब्ध झाल्याने वाडा कोलम जातीच्या लागवडीकडे शेतकरी दुरावत चालला आहे. सध्या वाडा कोलम या प्रकारच्या भाताचे सुमारे तीस ते चाळीस एकर इतक्या क्षेत्रावर लागवड होत आहे.
वाडय़ातील शेतकऱ्यांकडे असलेल्या जुन्या भाताच्या प्रकाराचे जतन करण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला असून वाडा कोलम या नावाने भौगोलिक मानांकन करण्यासाठी तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. वाडा भागातील शेतजमिनीचा कस, त्या परिसरातील वातावरण व इत्यादी घटकांमुळे भाताचे उत्पन्न चांगल्या प्रकारे देत असून बियाणासाठी वापरण्यात येणाऱ्या भाताची निवड योग्य पद्धतीने करून अधिक प्रमाणात बियाणे तयार करण्याचा मानस व्यक्त करण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यातील घोलवड येथील चिकू या फळाला भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर वाडय़ाच्या बारीक कोलम जातीच्या भाताला जीआय टॅग मिळविण्यासाठी वाडय़ातील शेतकरी, राजकीय पुढारी, शेती संदर्भात संस्था तसेच कृषी विभाग पुढे सरसावले आहेत.
वाडा कोलम या भाताच्या जातीला भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांची बैठक जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला वाडय़ातील जुन्या भाताच्या जातींची लागवड करणारे शेतकरी, कोलम बियाणांची जतन करणारे शेतकरी तसेच शेतीव्यवसायाशी संबंधित सर्व घटकांना सामावून घेतले जाणार आहे. भौगोलिक मानांकनाच्या प्रक्रियेला जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभाग पुढाकार घेत असून या सर्व प्रक्रियेत नावीन्यपूर्ण योजना किंवा विशेष घटक योजना याअंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा वापर करण्याचे विचाराधीन आहे.
– प्रवीण गवांदे, उपविभागीय कृषी अधिकारी वाडा