पाणी जाण्यासाठीचे मार्ग खुले करण्याच्या पालिकेकडून सूचना

रेल्वेने वसई ते नायगाव दरम्यान बांधलेल्या संरक्षक भिंतीमुळे पावसाळ्यात पाणी वाहून जाण्याचे मार्ग बंद होऊन पूरस्थितीचा धोका निर्माण झाला होता. पालिकेने त्याची गंभीर दखल घेत या भिंतीचे काम थांबविण्यात आले आहे. तसेच भिंतीमधून पाणी जाण्यासाठीचे मार्ग खुले करण्याच्या सूचना रेल्वेला दिल्या आहेत.

मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे वसई विरार भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे या परिसरातील नागरीवस्तीसह इतर सर्वच विभागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. याच बरोबरच रेल्वे रुळावर देखील पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक देखील ठप्प झाली होती. यामुळे वसईतील दैनदिन व्यवहार हेदहा दिवस बंद झाले होते. तशी स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी पालिकेच्या वतीने नालेसफाई, नाले रुंदीकरण, व नैसर्गिक नाल्याचे पुनरुज्जीवन करण्यास सुरवात केली होती. तसेच रेल्वेच्या भागात असलेली कलव्हर्ट बांधण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे देखील निधी देण्यात आला होता. एकीकडे पालिकेच्या वतीने पूरस्थिती उद्भवू नये यासाठी प्रयत्न केले जात असताना रेल्वे प्रशासनाकडून संरक्षक भिंतीचे काम करण्यात आले असल्याचे या भिंतीमुळे पूर्व आणि पश्चिम विभागातून येणाऱ्या पाण्याचा निचरा न झाल्यास पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेमार्फत नायगाव ते वसई रोड स्थानका दरम्यान संरक्षण भिंत बांधण्यात आली असून इतर भागातही  भिंत उभारण्याचे काम सुरू आहे. संरक्षणासाठी  ही भिंत तयार करण्यात आली असली तरी पाणी जाण्यासाठीचे असलेले मार्ग खुले ठेवणे गरजेचे असताना ते ठेवण्यात आले नव्हते.

वसई विरार महापालिकेच्या वतीने ३१ मे रोजी मान्सून पूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सभापती पंकज ठाकूर यांनी हा रेल्वेने बांधलेल्या संरक्षण भिंतीवर काय कारवाई झाली, याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. तसेच त्यावर अजून कारवाई झाली नसल्याने पुन्हा त्यामुळे संपूर्ण परिसरात पाण्याखाली पालिकेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांनी सांगितले कि बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंती संदर्भात रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले होते. त्यात पाणी जाण्याचे मार्ग मोकळे करावे अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या त्यानुसार रेल्वे प्रशासनाने उत्तर देताना मुंबई पासून दिल्ली पर्यंत बुलेट ट्रेन रेल्वे साठी संरक्षण भिंतीचे काम करण्यात येत आहे मात्र ते काम सध्या थांबविण्यात आले असल्याचे लाड यांनी सांगितले.