कल्याण डोंबिवली पालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीतर्फे दुर्गाडी खाडी किनारी उभारण्यात येत असलेल्या नौदल संग्रहालयात आरमारी सामुग्री बरोबर टी-८० ही नौदलातून निवृत्त झालेली युध्द नौका विराजमान करण्याचा निर्णय पालिका स्मार्ट सिटी कंपनी आणि नौदल अधिकाऱ्यांच्या एकत्रित बैठकीत होऊन, या विषयीचा सामंजस्य करार दोन्ही बाजुने करण्यात आला.

हेही वाचा >>>मिनाताई ठाकरे चौक उड्डाणपूलावर ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी

What is Maharashtra Maritime Board
‘गेट वे’ बोट दुर्घटनेमुळे चर्चेत आलेले ‘महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड’ नेमकं काय आहे? ते कसं काम करतं?
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Vasai Virar Municipal corporaton , Water Supply Vasai Virar, Water Team Vasai Virar ,
वसई : पालिकेचे पाणी पथक स्थापन, आमदारांनी खडसावताच पालिका सक्रिय
Vigilance for waterway safety in Vasai inspection of passenger boats
वसईतील जलमार्ग सुरक्षेसाठी सतर्कता, प्रवासी बोटींचे परीक्षण; ठेकेदारांना सूचना
Mumbai Boat Accident
Elephanta Caves: घारापुरी (एलिफंटा) लेणींना एवढे महत्त्व का? हजारो पर्यटक त्यांना रोज भेट का देतात?
loksatta readers feedback
लोकमानस: चाचणीला परवानगी मिळालीच कशी?
Mumbai construction debris Reprocessing Project in Dahisar
दहिसरमध्ये राडारोडा पुनर्प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित, आतापर्यंत १६ हजार मेट्रिक टन राडारोड्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया
big step by pune municipality to solve water problem in included villages
समाविष्ट गावातीत पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पालिकेचे मोठे पाऊल !

भारतीय नौदल मुख्यालयात बुधवारी झालेल्या सामंजस्य करार कार्यक्रमात नौदलाचे क्षेत्र अधिकारी जीलेट कोशी, कमांडर अभिषेक कारभारी, कॅप्टन पी. के. मन्ना, लेफ्टनंट अरुण कुमार, लेफ्टनंट सोम प्रकाश, लेफ्टनंट अर्जुन पंडित, कल्याण डोंबिवली पालिका स्मार्ट सिटी कंपनीतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे, प्रकल्प अभियंता तरुणा जुनेजा, वारसा वस्तू सल्लागार सचिन सावंत उपस्थित होते.

हेही वाचा >>>श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात ११ हजार कोटींची विकासकामे ; ‘एमएमआरडीए’च्या बैठकीत निधीची तरतूद

कल्याण शहराला ऐतिहासिक वारसा आहे. इतिहासकालीन खुणा शहरात आजही आहेत. या शहाराचे ऐतिहासिक महत्व कायम राहावे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास काळाला अभिवादन आणि त्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी दुर्गाडी खाडी किनारी आधारवाडी क्षेपणभूमीच्या बाजुला कल्याण डोंबिवली पालिकेने नौदल आरमार संग्रहालय उभारण्याचा निर्णय मागील वर्षी घेतला. राज्याच्या विविध भागातील नागरिक, अभ्यासकांना नौदल आरमार संग्रहालयाची मोकळ्या वातावरणात पाहणी करता यावी म्हणून हे संग्राहलय उभारण्यावर पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. या संग्रहालयामुळे राज्यातील शाळांना मुलांना नौदल संग्रहालय पाहण्यासाठी सहलींचे आयोजन करणे सोपे होईल. शाळकरी मुलांना सैनिक, लष्करी सामुग्री, आरमार, लष्करी गणवेश यांचे विशेष आकर्षण असते. परंतु, लष्करी क्षेत्र प्रतिबंधित असल्याने या वस्तू मुलांना पाहता येत नाही. यादृष्टीने हे संग्रहालय मार्गदर्शक असेल असे अधिकारी म्हणाला.या नौदल आरमार संग्राहलयाचा भूमिपूजन कार्यक्रम काही महिन्यापूर्वी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, माजी पालकमंत्री आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता.

हेही वाचा >>>डोंबिवलीत कचरा वेचणाऱ्या महिलेचा मंगळसूत्रावर डल्ला

टी-८० युध्दनौका
भारतीय नौदलातील जलदगतीने अचूक मारा करणारी टी-८० युध्दनौका ओळखली जात होती. महाराष्ट्राच्या किनारपट्टीची सुरक्षा राखण्यात या युध्दनौकेने महत्वाची कामगिरी पार पाडली. इस्त्रायल येथे मे. आय. ए. आय. रामता कंपनीने या युध्दनौकेची बांधणी केली आहे. ही युध्द २४ जून १९९८ मध्ये भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली होती. समुद्री पाण्या व्यतिरिक्त उथळ पाण्यातही ही युध्दनौका शूत्रला तोंड देऊ शकेल अशा पध्दतीने या नौकेची बांधणी करण्यात आली आहे. विहित वयोमानाप्रमाणे टी-८० युध्दनौका ७ ऑक्टोबर २०२१ मध्ये भारतीय नौदलातून सन्मानाने सेवानिवृत्त झाली आहे. या नौदलाचे योग्यरितीने जतन व्हावे, नागरिकांना नौदल युध्द नौकांची माहिती असावी, या विचारातून ही नौका कल्याण येथील आरमारी संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>कोपर-भिवंडी रेल्वे मार्गात आढळला तरुण-तरुणीचा मृतदेह; अपघात की आत्महत्या, तपास सुरु

नौदल संग्रहालयातील सामुग्री
नौदल संग्रहालयात प्राचीन ते आताच्या काळापर्यंतचा समृध्द सागरी इतिहास, आरमारांमध्ये होत गेलेले बदल दाखविण्यात येणार आहेत.
शिवकाळ, भारतीय नौदलनातील अनेक प्रेरणादायी घटनांचा इतिहास, शिल्पे, चित्र, कलाकृती मांडण्यात येणार आहे.
लष्करी कमांड्सचे अभ्यास दौरे, अभिलेख, ऐतिहासिक सामुग्री देवाणघेवाण दस्तऐवज संग्रहालयात असतील.

” नौदल संग्रहालय, ‘टी-८०’ या सामंजस्य करारामुळे भारतीय नौदलाचा कल्याण-डोंबिवली शहराशी आणि महाराष्ट्राच्या समृध्द नौदल वारशाच्या इतिहासाशी कायमचा संबंध जोडला जाणार आहे.”- तरुण जुनेजा ,प्रकल्प अभियंता ,स्मार्ट सिटी

Story img Loader