मीरा-भाईंदरमधील गृहनिर्माण सोसायटय़ांकडून प्रतिसाद नाही
ओला व सुका कचरा वेगळा करण्याच्या मोहिमेची प्रशासनाकडून प्रभावीपणे प्रसिद्धी न झाल्याने तसेच रहिवासी सोसायटय़ांकडून त्याला प्रतिसाद न मिळाल्याने ही मोहीम फक्त कागदावरच राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या सोसायटय़ांचे पाणी तोडण्याचा इशारा महापालिकेने दिला होता. परंतु शहरातली सध्याची पाण्याची परिस्थिती पहाता या कारवाईने लोकक्षोभाला सामोरे जावे लागेल या भीतीने प्रशासनाने सध्या शांत राहाण्याची भूमिका घेतली आहे.
घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार ओला व सुका कचरा वेगळा करणे बंधनकारक आहे. परंतु महापालिकेनेही आजपर्यंत हा बाब गांभीर्याने घेतली नव्हती. परंतु उत्तन येथील घनकचरा प्रकल्प बंद पडल्यानंतर दररोज जमा होणारा कचरा प्रशासनाची डोकेदुखी ठरू लागला आहे. कचऱ्याचे वर्गीकरण केल्यास प्रक्रिया करायच्या कचऱ्याचे प्रमाण अध्र्यावर येणार असल्याने आता कचऱ्याचे वर्गीकरण सक्तीचे करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. यासाठी ओला व सुका कचरा दोन वेगळ्या रंगाच्या डब्यांमध्ये साठविण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. सुरुवातीला विनंती, नंतर इशारा व तरीही कचरा वेगळा केली नाही तर सोसाटीची नळ जोडणी खंडित करण्याची आक्रमक भुमिका प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. एक मार्च पासून कचरा वेगळा स्विकारण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतू ही बाब सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचलेलीच नाही. कचऱ्याचे वर्गीकरण करा असे आवाहन करणारी पत्रके महापालिकेने काढली आहेत मात्र ही पत्रके सोसायटय़ांपर्यंत पोचलीच नाहित . महापालिकेची प्रचार यंत्रणा कमकुवत असल्याने जनजागृती अभावी सोसायटय़ांनी कचऱ्याचे वर्गीकरण केलेच नाही. त्यामुळे आजही कचरा एकत्रितपणेच गोळा केला जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा