अवघ्या मुंबईला ठाणे जिल्ह्यातील धरणांतून पाणीपुरवठा होतो. मात्र, दरवर्षी पावसाळय़ानंतरच्या काळात जिल्ह्यत अनेक ठिकाणी तीव्र पाणीटंचाई भासू लागते. एकीकडे, पाण्याची चणचण भासत असताना, दुसरीकडे काही भागांना वारेमाप पाणीपुरवठा होत असतो. हे सर्व होत असताना पाणीबिलाची आकारणी मात्र ‘ठरावीक’ दरांनुसारच केली जाते. साहजिकच पाण्याचा वापर आणि त्याचे बिल यांच्यात कोणतेही सूत्र उरत नाही. मीटरने पाण्याची मोजणी सुरू झाली तर बिलांचे दर वाढतील आणि आपली सत्ता धोक्यात येईल, अशी भीती महापालिकांमधील सत्ताधाऱ्यांना वाटते. ठाणे महापालिका निवडणुकीपूर्वी मीटर बसविण्याचा निर्णय पक्का होऊनही अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी नाही, यातच सर्व काही आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा