ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागातील जलसंधारण अधिकारी राजेंद्र पाटील (५७) याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. बंधाऱ्याच्या बांधकामाची मंजुरी देण्यासाठी राजेंद्र पाटीलने तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची माहिती पथकाने दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – ठाणे: अधिकृत फलकाबांजीच्या अतिरेकाला लगाम बसण्याची चिन्हे; ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले संकेत

हेही वाचा – गजानन माने यांना डोंबिवली भूषण

तक्रारदार यांचे ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात बंधारा बांधण्यासाठी निधी मंजूर झालेला आहे. या बंधाऱ्याचे बांधकाम सुरू करण्याची मंजुरी देण्यासाठी मंजूर निधीतील एक टक्का म्हणजेच, ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी राजेंद्र पाटील याने तक्रारदार यांच्याकडे केली होती. या प्रकारानंतर तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. पथकाने या प्रकरणाची पडताळणी केली असता, पाटील याने तक्रारदार यांच्याकडून ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने सापळा रचून पाटील याला लाच घेताना हातोहात पकडले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water conservation officer in thane caught for taking bribe ssb