ठाणे : स्टेम प्राधिकरणाकडून जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून या कामामुळे शुक्रवारी ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या काळात ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेचे नियोजन करुन टप्या टप्याने ठाणे शहरात एक वेळ पाणी पुरवठा सुरु ठेवण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. यामुळे नागरिकांना २४ ऐवजी १२ तास पाणी बंदचा सामना करावा लागणार आहे.

 ठाणे महापालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा शुक्रवार, १३ डिसेंबर रोजी सकाळी ९  ते शनिवार १४ डिसेंबर  रोजी सकाळी ९ असा २४ तासांचा बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात देखभाल, दुरुस्ती आवश्यक कामे तातडीचे करण्यात येणार आहेत. या काळात ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेचे नियोजन करुन टप्या टप्याने ठाणे शहरात एक वेळ पाणी पुरवठा सुरु ठेवण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. या नियोजनानुसार, घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कम्पाउंड, आझादनगर, डॉगरीपाडा, वाघबीळ, आनंदनगर, कासारवडवली, ओवळा, इत्यादी ठिकाणाचा पाणी पुरवठा १३ डिसेंबर  रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजे पर्यंत बंद राहील. समतानगर, ऋतुपार्क, सिध्देश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत. उथळसर, रेतीबंदर, कळव्याच्या व मुंब्राचा काही भागाचा पाणी पुरवठा १३ डिसेंबर रोजी रात्री ९ ते शनिवार, १४ डिसेंबर रोजी सकाळी ९ या वेळेत बंद राहील. अश्या रीतीने टप्या टप्याने एक वेळ पाणी पुरवठा सुरु ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.या बंदमुळे पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे.

badlapur khopoli trains news
बदलापूर – खोपोली लोकल बंद, कर्जत येथे रविवारी वाहतूक ब्लॉक
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Thane Municipal Administration plans 100 day program to improve citizens daily lives
ठाणे-बोरिवली मार्गाच्या कामाला होणार जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा
Municipal administration to clean 23 ponds in Thane
ठाण्यातील २३ तलावाची होणार सफाई; पाण्यावरील तरंगता कचरा केला जाणार साफ
cr start work of widening the pedestrian bridge at Diva railway station
दिवा रेल्वे पादचारी पुलावरील गर्दीचा ताण कमी होणार! ;मध्य रेल्वेकडून पुलाच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात
Kalyan-Dombivli water, amrit water channel,
कल्याण-डोंबिवलीत पाण्याचा ठणठणाट, अमृत जलवाहिनीचे काम सुरू असताना विद्युत वाहिका तुटली
Ujani Dam, Ujani Dam Agriculture Water ,
उजनीतून एप्रिलपर्यंत शेतीसाठी पाण्याची तीन आवर्तने, पहिल्या आवर्तनासाठी १४.१७ टीएमसी पाणी
delhi fog flights stuck
दिल्लीत धुक्याची चादर, दृश्यमानता शून्यावर, १०० विमानांचा खोळंबा
Story img Loader