अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील ज्या भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. तो पाणीपुरवठा आज बुधवार, ५ मार्च रोजी १२ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत मुख्य जलवाहिनीवर तातडीचे देखभाल दुरूस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे गुरूवारी आणि शुक्रवारीही पाणी पुरवठा अनियमीत आणि कमी दाबाने होऊ शकतो.

अंबरनाथ शहराला तीन वेगवेगळ्या स्त्रोतांच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. अंबरनाथ शहराचे चिखलोली हे स्वतःचे एक धरण आहे. या धरणातून शहराच्या पूर्व भागात पाणीपुरवठा केला जातो. तर त्याचवेळी महाराष्ट्र औद्योगिक विकासम महामंडळच्या बारवी धरणातून येणारे पाणीही अंबरनाथ शहराला पुरवले जाते. त्याचवेळी बदलापूर उल्हास नदीतून बॅरेज बंधारा येथे जीवन प्राधिकरण पाणी उचलून प्रक्रिया केल्यानंतर अंबरनाथ आणि बदलापूर शहराला पाणी पुरवठा केला जातो. या जलवाहिनीच्या मुख्य वाहिनीवर आज, बुधवार, ५ मार्च रोजी तातडीने देखभाल दुरूस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे अंबरनाथ शहर, आयुध निर्माण संस्था यांना होणारा पुरवठा ५ मार्च रोजी १२ तासांसाठी बंंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे अंबरनाथ शहर, आयुध निर्माण संस्था यांना होणारा पाणी पुरवठा बंद असेल. तसेच पुढील दोन दिवस पाणीपुरवठा अनियमीत पाणी कमी दाबाने होईल, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिली आहे. त्यामुळे पाणी जपून वारण्याचे आवाहन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.

Story img Loader