कल्याण: बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण पूर्व आडिवली-ढोकळी भागात गेल्या काही महिन्यांपासून बेकायदा इमारतींमधील शौचालय टाक्यांमधील मलपाणी रस्त्यावर वाहून येत आहे.  त्यामुळे आडिवली-ढोकळी भागातील वर्दळीचा रस्ता दुर्गंधीयुक्त पाण्याने सतत भरला असल्याने वाहन चालक, प्रवासी त्रस्त आहेत.

आडिवली-ढोकळी भागात जागा मिळेल तिथे भूमाफियांनी बेकायदा इमारती बांधल्या आहेत. या इमारतींना सामासिक अंतर नाही. शौचालयाच्या टाक्या रस्त्यावर, इमारतीच्या प्रवेशव्दारात बांधण्यात आल्या आहेत. या टाक्यांना पालिकेच्या मलनिस्सारण वाहिन्यांन्या जोडलेल्या नसल्याने मलपाणी रस्त्यावर वाहून येत आहे. रात्रीच्या वेळेत या भागातील रहिवासी दुर्गंधीने त्रस्त होतात.

nagpur pollution increased on diwali due to use of firecrackers
प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्पना हवेत ,कोट्यवधींच्या फटाक्यांचा आवाज व धूर
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
traffic jam on pune Bengaluru highway
पुणे – बंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या रांगाच रांगा
Pune air, bad air, Pune air at hazardous levels
पुण्याची हवा धोकादायक पातळीवर, बिघडलेल्या हवेचे परिणाम काय?
Constant changes in the states climate But wait for the winter
राज्यात थंडीची प्रतिक्षाच! पाऊस मात्र…
Maharashtra winter updates
Winter News: नोव्हेंबरमध्ये अपेक्षित थंडी नाहीच; मध्य, दक्षिण भारतात जोरदार पावसाचा अंदाज
fire incidents at 14 places in pune city on lakshmi laxmi pooja
पुणे : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात ३१ ठिकाणी आगीच्या घटना; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे गंभीर घटना टळल्या
Mumbai air quality remains in moderate category
दिवाळीच्या दिवसांत मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच; कोणत्या भागातील हवा ‘अतिवाईट’?

हेही वाचा >>> डोंबिवलीतील आरव गोळे बालकाकडून धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया ३९ किमीचा सागरी टप्पा पार

शाळकरी मुले, पालक या रस्त्यावरुन प्रवास करतात. त्याचा त्यांना त्रास सहन करावा लागतो. या रस्त्याची बांधणी करावी. रस्त्यावर येणारे पाणी रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी या भागातील रहिवाशांनी कल्याण डोंबिवली पालिका अधिकाऱ्यांकडे केली आहे. त्याची दखल घेतली जात नाही, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील नांदिवली स्वामी समर्थ मठ भागात रस्त्यावरील धुळीने नागरिक हैराण

कल्याण डोंबिवली पालिकात हद्दीत स्मार्ट सिटीची अनेक कामे सुरू आहेत. काँक्रिटीकरणाच्या कामांचे गोडवे गायले जात आहेत. कल्याण पूर्व भागातील आडिवली ढोकळी भागातील रहिवाशांना रस्ते सुविधेत उपेक्षेची वागणूक का दिली जात आहे, असे प्रश्न या भागातील रहिवासी करत आहेत. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील नागरी सुविधा प्रश्न तातडीने मार्गी लागावेत म्हणून शिवसेनेचे खा. डाॅ. श्रीकांत शिंदे हिरीरिने प्रयत्न करत आहेत. त्यांनी या रस्ते प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.