१३ इमारतींचा मालमत्ता कर थकवल्याने वसई-विरार महापालिकेकडून नोटीस
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वसई-विरार महापालिकेच्या क्षेत्रात असलेल्या पश्चिम रेल्वेच्या इमारतींचा करभरणा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेला नाही. तब्बल ७८ लाख रुपयांचा कर पश्चिम रेल्वेने महापालिका प्रशासनाचा थकवला आहे. या थकबाकीमुळे महापालिकेचे मोठे नुकसान होत असून करभरणा लवकरात लवकर करावा यासाठी महापालिकेने पश्चिम रेल्वेला नोटीस पाठवली आहे. काही इमारतींमधील पाणीपुरवठाही महापालिकेकडून थांबवण्यात आला आहे.
वसई-विरार महापालिका परिसरात येणाऱ्या नवघर माणिकपूर परिसरात रेल्वेच्या १३ इमारती आहेत. मात्र या इमारतींचा मालमत्ता कर अजूनही रेल्वेने महापालिकेला भरला नाही. जवळपास ७८ लाख रुपयांहून अधिक कर महापालिकेला थकीत असल्याने या इमारतींना पुढील सेवा देणार कशा, असा प्रश्न पालिकेसमारे उभा आहे. नागरिकांकडून वसूल केला जाणारा कर महापालिकेच्या उत्पनाचे मोठे साधन आहे. जर कराचा भरणा झाला नाहीतर त्याचा विकासकामांवर परिणाम होतो. पश्चिम रेल्वेने मोठय़ा प्रमाणात कर थकवल्याने महापालिकेने आता त्यांच्या इमारतींवर कारवाईस सुरुवात केली आहे.
रेल्वे प्रशासनाला थकीत असलेली कराची रक्कम लवकर भरण्यात यावी यासाठी नोटीस पाठवण्यात आली होती. महिनाभरात रक्कम भरली जाईल, असे रेल्वेच्या प्रशासनाने सांगितले होते. मात्र अजूनही कराची रक्कम न भरल्यामुळे महापालिकेने इमारतींचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. – विश्वनाथ तळेकर, मालकत्ता करसंकलन विभाग
महापालिकेच्या कराची किती थकबाकी आहे याची सविस्तर माहिती घेणार आहे. त्यानंतर वरिष्ठांशी चर्चा केली जाईल. – मुकुल जैन, विभागीय व्यवस्थापक, पश्चिम रेल्वे
..तर मालमत्ता जप्त
पश्चिम रेल्वेने कराची रक्कम लवकरात लवकर भरावी, अशी नोटीस महापालिका प्रशासनाने पाठवली आहे. लवकरच ही रक्कम भरली जाईल, असे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले होते. मात्र अद्याप थकबाकी भरली नसल्याने काही ठिकाणी पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली. यानंतरही मालमत्ता कर जर पश्चिम रेल्वेकडून भरला गेला नाही तर या मालमत्ता जप्त करण्यात येईल, असा इशारा महापालिकेकडून देण्यात आला आहे. ३१ डिसेंबरनंतर कर भरल्यास दोन टक्के शास्ती लावून कर वसूल केला जाणार आहे.