लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : ठाणे महापालिकेची स्वत:ची योजना आणि स्टेम प्राधिकरणाकडून ठाणे शहराला होणारा पाणी पुरवठा जलवाहिनी दुरुस्ती कामामुळे शुक्रवारी २४ तासांसाठी बंद ठेवण्यात आला होता. शनिवारी दोन्ही स्त्रोतांकडून पाणी पुरवठा सुरू झाला असला तरी तो कमी दाबाने होत आहे. यामुळे ठाणे, घोडबंदर भागातील रहिवाशांना सोमवारीही पाणी टंचाईचा सामना करावा लागला. दरम्यान, शहरातील पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी स्टेम प्राधिकरणाकडून अतिरिक्त पाणी घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
special fund of 20 lakhs each to all departmental offices of Mumbai Municipal Corporation
सुविधांसाठी पालिकेचे पाच कोटी, पालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांना प्रत्येकी २० लाखांचा विशेष निधी
edible oil import india
खाद्यतेलात आत्मनिर्भर होण्याच्या घोषणा हवेतच ! जाणून घ्या, एका वर्षात किती खाद्यतेलाची आयात झाली आणि त्यासाठी किती रुपये मोजले
swiggy employee stock option scheme
स्विगीचे ५०० कर्मचारी कोट्याधीश
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…

ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यात महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून २५० दशलक्षलीटर, स्टेम प्राधिकरणाकडून ११५ दशलक्षलीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्षलीटर आणि मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे हे सर्वच स्त्रोत शहरातील पाणी पुरवठ्याच्या दृष्टीकोनातून महत्वाचे मानले जातात. त्यापैकी स्टेम आणि महापालिका योजनेतून होणारा पाणी पुरवठा जलवाहीनी दुरुस्तीकामामुळे शुक्रवारी चोवीस तासांसाठी बंद ठेवण्यात आला होता. यामुळे घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतुपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिध्दांचल, इंदिरानगर, रुपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, मुंब्रा व कळव्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. शहरात ३६५ दशलक्षलीटर इतकी पाणी कपात होऊन प्रत्यक्षात २२० दशलक्ष लीटर इतकाच पाणी पुरवठा झाला. तर, गुरूवारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेतील पाणी पुरवठा जलवाहीनी दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला होता. या पाणी बंदमुळे शहरात ठिकठिकाणी पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली. शनीवारी तिन्ही स्त्रोतांकडून पाणी पुरवठा सुरू झाला. पण, तो कमी दाबाने झाल्याने टंचाईची समस्या सोमवारपर्यंत कायम होती.

आणखी वाचा-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्केंना का दिली चांदीची गदा?

पाणी बंदच्या काळात गृहसंकुलातील साठवणुक टाकीतील पाण्याचे नियोजन करून त्याचा सदनिकांमधील रहिवाशांना पुरवठा करण्यात आला. यामुळे दोन दिवसांत साठवणुकीतील पाणीही संपले. तसेच महापालिकेकडून पाणी सुरु झाल्यानंतर ते कमी दाबाने झाले. नेहमीपेक्षा खूपच कमी पाणी आल्यामुळे संकुलातील रहिवाशांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला, अशी माहिती ग्रँड सक्वेअर संकुलाचे सरचिटणीस जनार्दन लाड यांनी दिली. तर, गेल्या दोन दिवसांपासून संकुलात पाणीच आलेले नाही. संकुलमधील साठवणुक टाकीतील पाण्याचा पुरवठा रहिवाशांना करण्यात आला. यामुळे दोन वेळे ऐवजी एक वेळ पाणी देण्यात आले, अशी माहिती भक्तीपार्क संकुलाचे पदाधिकारी राकेश सिंग यांनी सांगितले. टंचाईग्रस्त भागात पालिकेकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असला तरी टँकरची संख्या पुरेशी नाही. यामुळे अनेकांना पाण्याच्या टँकरची वाट पाहावी लागली.

आणखी वाचा-परवाना न घेता मटण विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून ३८ हजाराचा दंड वसूल

ठाणे महापालिकेची स्वत:ची योजना आणि स्टेम प्राधिकरणाकडून ठाणे शहराला होणारा पाणी पुरवठा जलवाहिनी दुरुस्ती कामामुळे शुक्रवारी चोवीस तासांसाठी बंद ठेवण्यात आला होता. या बंद नंतर कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने अनेक ठिकाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. शहरात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असला तरी टँकरची संख्या मर्यादित असल्यामुळे पाणी पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. यामुळे शहरातील पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी स्टेम प्राधिकरणाकडून अतिरिक्त पाणी घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे, अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.