लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : वडाळा- घाटकोपर- कासारवडवली या मेट्रो चार मार्गिकेच्या कामांमुळे ठिकठिकाणी खोदकामे झाले असून या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत आहे. महापालिकेकडून पाणी साचू नये असे आवाहन नागरिकांना केले जाते. पंरतु शासकीय प्रकल्पांच्या कामांच्या ठिकाणीच पाणी साचून रोगराईला निमंत्रण मिळत असल्याचे चित्र आहे. तसेच खड्ड्यात पडून एखाद्या गंभीर अपघाताची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.

Cylinder explosion on a handcart in front of Shivajinagar court pune news
शिवाजीनगर न्यायालयासमोरील हातगाडीवर सिलिंडरचा स्फोट; तीनजण किरकोळ भाजून जखमी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
water pipe bursts in Dombivli
डोंबिवलीत काँक्रीट रस्ते काम करताना जलवाहिनी फुटली;  पी. पी. चेंबर्सजवळ शेकडो लीटर पाणी वाया
When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
Water supply cut off in Malad Mumbai news
मालाडमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद; पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन
problem of potholes on Khopta bridge to Koproli road will cleared soon
खोपटे पूल ते कोप्रोली मार्ग लवकरच खड्डेमुक्त, एक किलोमीटर रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी सात कोटींच्या निधीस मंजुरी
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
Lakshmi Road will be closed again within three months after Ganeshotsav
गणेशोत्सवानंतर तीन महिन्यातच ‘लक्ष्मी रस्ता’ पुन्हा राहणार बंद, काय आहे कारण?

मुंबई उपनगर आणि ठाणे शहरातील रस्ते मार्गिकेवर होणारी वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. या कामासाठी ठाणे शहरातील पूर्व द्रुतगती महामार्ग, घोडबंदर भागात सेवा रस्ते, मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी मेट्रोचे खांब उभारणीसाठी खड्डे खणले आहेत. या खड्ड्यांभोवती पुरेसे संरक्षण पत्रे बसविण्यात येत नाही. त्यामुळे अनेकदा प्रवासी किंवा पादचारी या खड्ड्यात पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये आता पाणी साचू लागले आहे. खड्ड्यांची खोली आणि रुंदी मोठी असल्याने पाण्याचे प्रमाणही अधिक आहे.

आणखी वाचा-भिवंडीत सहा वर्षीय मुलाची क्षुल्लक कारणावरून हत्या

ठाणे महापालिकेकडून दरवर्षी नागरिकांना घरामध्ये पाणी साठवून ठेऊ नका असे आवाहन केले जाते. परंतु एमएमआरडीएकडूनच, खड्ड्यांमध्ये साठलेल्या पाण्याचा निचरा केला जात नाही. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, साथीचे आजार पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच या खड्ड्यांभोवती पुरेसे संरक्षण पत्रे देखील बसविण्यात आले नाही. त्यामुळे एखादा वाहन चालक पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडू मोठ्या अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. येथील पाणी तात्काळ उपसावे अशी मागणी नागरिक करत आहेत.

पावसाने उसंत घेतल्यानंतर खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी पंपद्वारे बाहेर काढण्यात येते. ज्या ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहे त्याठिकाणी साचलेल्या पाण्याचा वेळोवेळी निचरा केला जातो असे एमएमआरडीए प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले.

Story img Loader