ठाणे : दिवा आणि मुंब्रा शहरात जलवाहिनीच्या दुरुस्ती कामांमुळे येथील काही भागात उद्या, बुधवारी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.

हेही वाचा – डोंबिवलीत द्राक्ष घेताना ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या फेरीवाल्याला ग्राहकाने चोपले

दिवा आणि मुंब्रा शहरातील काही भागांत औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणी पुरवठा केला जातो. येथील जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम बुधवारी केले जाणार आहे. दुरुस्तीच्या काळात दिवा आणि मुंब्रा शहरातील निर्मल नगरी, रामेश्वर पार्क, दोस्ती संकुल परिसर, भोलेनाथ नगर, रोझ नगर, एम एम व्हॅली परिसर, कादर पॅलेस ते किस्मत कॉलनी, चांद नगर परिसर, खडी मशीन रोड, शिवाजी नगर या परिसरातील पाणी पुरवठा बुधवारी सकाळी १० ते रात्री १० यावेळेत बंद राहील, असे महापालिकेने स्पष्ट केले.

Story img Loader