कल्याण- कल्याण पूर्व, पश्चिम शहराचा पाणी पुरवठा मंगळवारी (ता.२०) सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत कल्याण शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बारावे येथील जलशुध्दीकरण केंद्रात देखभाल आणि दुरुस्तीचे काम केले जाणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी दिली.
हेही वाचा : Maharashtra News Live : महाराष्ट्रातील विविध घडामोडींची माहिती एका क्लिकवर
दुरुस्तीच्या कालावधीत पाणी बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल एवढे पाणी साठा करुन ठेवावे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.