ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी जलशुद्धीकरण केंद्राची तातडीची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे या कामासाठी ठाण्यातील काही भागात उद्या, गुरुवारी २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. ठाणे महापालिका क्षेत्रातील कोलशेत, वागळे इस्टेट, दिवा, मुंब्रा, कळवा येथील भागात औद्योगिक विकास महामंडळा मार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ठाणे: मुख्यमंत्र्यांसह राजकीय नेत्यांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ; मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस सतर्क

महामंडळाच्या बारवी जलशुद्धी केंद्राची तातडीची दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील पाणी पुरवठा गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. कोलशेत येथील खालचा गाव, वागळे इस्टेट येथील किसननगर क्रमांक २, नेहरूनगर, रूपादेवी पाडा, कळवा, दिवा, मुंब्रा येथील काही भागात पाणी पुरवठा बंद राहिल. पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply remains close tomorrow in some part of thane area zws
Show comments