ठाणे : गेले चार दिवस सुरू असलेल्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करत पालिका प्रशासनाने शहराचा पाणी पुरवठा सुरळीत केला असला तरी, ठाणे, घोडबंदर, कोपरी, वागळे इस्टेट भागातून पाणी टंचाईच्या तक्रारी पालिकेकडे येत आहेत. दुरुस्ती कामासाठी लागू केलेल्या ५० टक्के कपातीमुळे शहरातील अनेक भागांचा पाणी पुरवठा काही तासांसाठी बंद ठेवण्यात आला होता. पाणी पुरवठा बंद असलेल्या भागांमध्ये मोठ्या दाबाने पाणी पुरवठा केल्यास जलवाहिन्या फुटण्याची भिती असून या पार्श्वभूमीवर अशा भागांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळेच ठाण्यात पाणी पुरवठा पूर्ववत होऊन २४ तासांचा काळ लोटला तरी टंचाई मात्र कायम असल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यात महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून २५० दशलक्षलीटर, स्टेम प्राधिकरणाकडून ११५ दशलक्षलीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्षलीटर आणि मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे हे सर्वच स्रोत शहरातील पाणी पुरवठ्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचे मानले जातात. यापैकी ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून आणि स्टेम प्राधिकरणाकडून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. या कामामुळे गेल्या मंगळवारपासून शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात ५० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती. शनिवारपर्यंत ही कपात लागू राहणार होती. या काळात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून पालिकेने शनिवारपर्यंत विभागवार पद्धतीने पाणी पुरवठ्याचे नियोजन केले होते. त्यानुसार काही भागात १२ तांस, तर काही भागात २४ तासांनंतर पाणी पुरवठा करण्यात येत होता. यामुळे शहराच्या विविध भागांत पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. पाणी पुरवठ्यासाठी टँकरची मागणी वाढली होती.

हेही वाचा – ठाणे : उल्हासनगरात विकासकामांसाठी ४७ कोटींचा निधी; रस्ते कॉंक्रिटीकरणासह पायाभूत सुविधा उभारणार

दरम्यान, पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने शनिवारी काम पूर्ण करत रविवारपासून शहराचा पाणी पुरवठा पूवर्वत केला आहे. परंतु, या भागांमध्ये अद्यापही टंचाईची समस्या कायम असल्याचे चित्र आहे. ठाणे, घोडबंदर, कोपरी, वागळे इस्टेट भागात पाणी टंचाई असल्याच्या तक्रारी पालिकेकडे येऊ लागल्या असून, त्यासाठी नागिरक समाजमाध्यमांचा वापर करीत आहेत. कळवा, मुंब्रा, दिवा परिसरात एमआयडीसी, तर कोपरी आणि वागळे इस्टेटमधील काही भागांत मुंबई महापालिकेमार्फत पाणी पुरवठा होतो. या दोन्ही स्रोतांमार्फत होणारा पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरू असल्याने हे परिसर टंचाईमुक्त असल्याचे चित्र आहे. असे असले तरी मुंब्रा येथील ठाकूरपाडा भागात गेले तीन दिवस पाणी नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा – डोंबिवलीतील आयरे, कोपर पूर्व हरितपट्ट्यावर कारवाईचे आयुक्तांचे आदेश; बेकायदा इमारतीत रहिवासी घुसविण्याचा प्रयत्न

गेले चार दिवस सुरू असलेल्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करून रविवारपासून शहराचा पाणी पुरवठा पूवर्वत केला आहे. तसेच पाणी पुरवठा पूवर्वत झाल्यानंतरही टंचाईची समस्या जाणवत असेल, तर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे तक्रार करावी. या तक्रारीवर तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे ठाणे महापालिका पाणी पुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार म्हणाले.