ठाणे : भिवंडी येथील मानकोली भागात मुख्य जलवाहिनीची पाणी गळती बंद करण्यासाठी तसेच अनधिकृत नळ जोडण्या खंडीत करण्यासाठी बुधवारी सकाळी ठाणे महापालिका क्षेत्रातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत मानकोली एमबीआर येथे मुख्य जलवाहिनीस गळती होते. त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर होतो. तसेच स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पिसे ते टेमघर जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळ जोडण्या खंडीत करणे आवश्यक आहे.
त्यामुळे ठाणे महापालिकेने बुधवारी (९ मार्च) सकाळी ९.०० ते रात्री ९.०० या कालावधीत महापालिका क्षेत्रातील काही भागात पाणी पुरवठा बंद करण्याचे नियोजन केले आहे.त्यामुळे बुधवारी घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतुपार्क, कारागृह परिसर, गांधीनगर, रुस्तमजी, सिध्दांचल, इंदिरानगर, रुपादेवी श्रीनगर, समतानगर, सिध्देश्वर, इटर्निटी, जॉन्सन, मुंब्रा व कळवा शहरातील काही भागाचा पाणी पुरवठा १२ तासांसाठी पुर्णपणे बंद राहणार आहे.