कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहिली, बारावे आणि टिटवाळा येथील जलशुध्दीकरण केंद्रात विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांचे काम करायचे असल्याने येत्या मंगळवारी या तिन्ही जलशुध्दीकरण केंद्रातील पाणी पुरवठा सकाळी नऊ ते रात्री नऊ वेळेत बंद राहणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या कालावधीत कल्याण पूर्व, पश्चिम, वडवली, शहाड, टिटवाळा परिसराला होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे, असे महापालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी सांगितले.

हेही वाचा… “ही तर राक्षसी राजवट…” बारसूतील लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर आव्हाडांनी व्यक्त केला संताप

मंगळवारी पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी एक दिवसाचा पुरेसा साठा करुन ठेवावा, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.