ठाणे : ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेमधील मुख्य जलवाहिनी स्थलांतरीत करण्याचे काम आज, बुधवारपासून हाती घेण्यात आले असून या कामामुळे ठाण्यातील काही भागात पुढील २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या बंदनंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून, यामुळे या भागांतील रहिवाशांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्ष लीटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यात महापालिकेच्या योजनेतून २५० दशलक्ष लीटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचा हा महत्वाचा स्रोत मानला जातो. ठाण्यातील माजीवडा येथील लोढा धाम भागातील भारतीय राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूस असलेली महापालिकेच्या स्वत:च्या योजनेमधील दोन हजार मि.मी व्यासाची मुख्य जलवाहिनी स्थलांतरीत करण्यात येणार आहे. हे काम बुधवारी हाती घेण्यात येणार असून यामुळे ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा आज बुधवार सकाळ ९ ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत असा २४ तास बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे ठाण्यातील काही भागांत पुढील २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या बंदमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – कल्याण: कोल्हापूरच्या ट्रक चालकाला लुटणारा तडीपार गुंडास कल्याणमध्ये अटक

हेही वाचा – डोंबिवलीतील आयरे हरितपट्ट्याला कोपर पश्चिमेतून चोरुन पाणीपुरवठा; बेकायदा वाहिन्यांमुळे रेल्वे रूळाला धोका निर्माण होण्याची भीती

कोणत्या भागात पाणी नाही?

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील माजीवडा, घोडबंदर रोड, पातलीपाडा, गांधीनगर, सिद्धांचल, ऋतुपार्क, जेलटाकी, सिद्धेश्वर, समतानगर, इंदिरानगर, लोकमान्यनगर, श्रीनगर, रामनगर, इटर्निटी, जॉन्सन, साकेत, रुस्तमजी वसाहत परिसर, कळव्याच्या आणि मुंब्र्याच्या काही भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply to some parts of thane will remain close for the next 24 hours ssb