ठाणे : ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेमधील मुख्य जलवाहिनी स्थलांतरीत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे ठाण्यातील काही भागांत बुधवारी २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या बंदनंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने ठाणेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

ठाणे येथील माजीवडा येथील लोढा धाम भागातील भारतीय राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूस असलेली महापालिकेच्या स्वत:च्या योजनेमधील दोन हजार मि.मी व्यासाची मुख्य जलवाहिनी स्थलांतरीत करण्यात येणार आहे. हे काम बुधवारी हाती घेण्यात येणार असून यामुळे ठाण्यातील काही भागांचा पाणी पुरवठा बुधवार सकाळ ९ ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत असा २४ तास बंद ठेवण्यात येणार आहे.

badlapur khopoli trains news
बदलापूर – खोपोली लोकल बंद, कर्जत येथे रविवारी वाहतूक ब्लॉक
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Thane Municipal Administration plans 100 day program to improve citizens daily lives
ठाणे-बोरिवली मार्गाच्या कामाला होणार जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा
Water connections of 245 houses disconnected due to water theft
पाणी चोरी भोवली, २४५ घरांची नळ जोडणी तोडली
Municipal administration to clean 23 ponds in Thane
ठाण्यातील २३ तलावाची होणार सफाई; पाण्यावरील तरंगता कचरा केला जाणार साफ
Badlapur, chemical sewage channel, underground sewerage scheme, old channel, sewage Badlapur, l
बदलापूर : रासायनिक सांडपाणी वाहिनीचा प्रश्न सुटणार! १२८ कोटींच्या भुयारी गटार योजनेला सुरुवात, जुनी वाहिनी बदलणार
Ujani Dam, Ujani Dam Agriculture Water ,
उजनीतून एप्रिलपर्यंत शेतीसाठी पाण्याची तीन आवर्तने, पहिल्या आवर्तनासाठी १४.१७ टीएमसी पाणी
Akola Municipal Corporation privatization tax collection
करवसुलीच्या खासगीकरणाचा राज्यातील एकमेव प्रयोग फसला; अकोला महापालिकेपुढे आता…

हेही वाचा – उल्हासनगर पालिकेचा ४०० कोटींचा दंड माफ; एमआयडीसीचा पाणीपट्टीवरील दंड माफ करण्याचा निर्णय

हेही वाचा – ‘पीएम किसान’ योजनेच्या लाभापासून ठाणे जिल्ह्यातील हजारो शेतकरी वंचित, महसूल विभागातून उडवाउडवीची उत्तरे

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील माजीवडा, घोडबंदर रोड, पातलीपाडा, गांधीनगर, सिद्धांचल, ऋतुपार्क, जेलटाकी, सिद्धेश्वर, समतानगर, इंदिरानगर, लोकमान्यनगर, श्रीनगर, रामनगर, इटर्निटी, जॉन्सन, साकेत, रुस्तमजी वसाहत परिसर, कळव्याच्या आणि मुंब्र्याच्या काही भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या बंदमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा आणि ठाणे महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Story img Loader