कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील नागरिकांना जुन्या दरानेच पाणी दर आकारणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पालिकेच्या या निर्णयाला शासनाने मंजुरी दिल्याने प्रशासनाने १ एप्रिलपासून जुनेच पाणी दर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

पालिकेचा अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी पाणी पुरवठा विभागाकडून पालिकेचा महसूल वाढ करण्याच्या दृष्टीने पाणी दर वाढीचे प्रस्ताव आयुक्तांंकडे दाखल केले जातात. नवीन वाढीव दर लागू केले तर नागरिकांकडून ओरड सुरू होते. आणि त्याचा परिणाम मग राजकीय मंडळींकडून दबाव येण्याकडे होतो. आगामी पालिका निवडणुकींचा विचार करून या राजकीय दबावापोटीच प्रशासनाने नागरिकांवर पाणी दर वाढीचा बोजा न टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.

maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Chandrapur city Rain of Rs 200 notes morning aam aadmi party BJP election campaign
आश्चर्य! चंद्रपूर शहरात पहाटे चक्क २०० रूपयांच्या नोटांचा पाऊस…
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced that will waive off the loans of farmers after mahayuti govt
“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
thane district water scarcity maharashtra assembly election 2024 election campaigning
तहानलेल्या वस्त्यांमध्ये प्रचारतही पाणी मुद्द्याची टंचाई, जिल्ह्यातील इतर मतदार संघांमध्ये मात्र पाणीप्रश्नावरून राजकारण तापले
The Meteorological Department has given the forecast of rain in the state of Maharashtra
थंडी सुरू झाली नाही की आता पाऊस येऊन धडकणार…राज्यातील या भागात…
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका

हेही वाचा – आधी संसदेत हनुमान चालिसा, आता थेट व्हिडीओ; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून हनुमान जयंतीदिनी विशेष व्हिडीओ पोस्ट

या नवीन दर प्रणालीप्रमाणे गेल्या वर्षी ज्या दराने नागरिकांनी पाणी दराची देयके भरली त्याच दराने आगामी आर्थिक वर्षात नागरिकांंना पाणी दराची देयके भरावी लागणार आहेत. ही दरवाढ न केल्याने पालिकेला मिळणाऱ्या वाढीव महसुलावर पाणी सोडावे लागते. पालिकेला दरवर्षी पाणी देयक वसुलीतून सुमारे ८० कोटी महसूल मिळणे अपेक्षित असते. या पाणी दर वसुलीतील सुमारे २० ते ३० कोटी वसुलीवर पालिकेला पाणी सोडावे लागले.
आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशाप्रमाणे मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे यांंनी १ एप्रिलपासून प्रशासकीय ठरावाप्रमाणे जुने पाणी दर लागू करण्याचे आदेश दिले आहेत. फेब्रुवारीमध्ये जुने पाणी दर लागू करण्याचा ठराव प्रशासनाने केला होता. आगामी आर्थिक वर्षासाठी पालिकेने पाणी देयकाच्या माध्यमातून ९० कोटी ६० लाख रुपये वसुलीचा लक्ष्यांंक पालिका अर्थसंकल्पात निश्चित केला आहे.

हेही वाचा – डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी

पाणी दर आकारणी

सर्व प्रकारच्या घरगुती पाणी वापरासाठी प्रति घनमीटर ७ रुपये आकारणी.

धार्मिक स्थळे, शिक्षण संस्था प्रति घनमीटर १५ रुपये.

सर्व प्रकारची व्यापारी दुकाने प्रति घनमीटर ३० रुपये.

१५ खाटांच्या रुग्णालयांना प्रति घनमीटर ३० रुपये.

१५ हून अधिक खाटांच्या रुग्णालयांसाठी प्रति घनमीटर ५० रुपये.

उपहारगृहे, मंगल कार्यालये, व्यापारी निवासी संकुल प्रति घनमीटर ६० रुपये.

कारखाने, तबेले, गॅरेज प्रति घनमीटर ६० रुपये.