कडोंमपाने नेमलेल्या टँकरचालकांकडूनच पाण्याची परस्पर विक्री
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
धरणातील पाण्याचे साठे आटू लागल्याने रहिवाशांनी पाण्याचा जपून वापर करावा यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने एकीकडे जनजागृती मोहीम सुरू केली असताना महापालिकेने नेमलेले खासगी टँकरचालक महापालिकेच्या जलकुंभांवरून पाणी भरून एक हजार रुपये ते दीड हजार रुपयांना विकू लागल्याची धक्कादायक माहिती पुढे येऊ लागली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरातील टंचाईग्रस्त भागात पाणी वाहून नेणाऱ्या अशा टँकरच्या रांगा दिसू लागल्या असून नागरिकांकडून त्यासाठी पैसे वसूल केले जात असल्याच्या तक्रारीही वाढू लागल्या आहेत.कल्याण-डोंबिवली परिसरातील टंचाईग्रस्त भागात पाणी वाहून नेणाऱ्या अशा टँकरच्या रांगा
कल्याण-डोंबिवलीच्या अनेक भागांत तीव्र पाणीटंचाई आहे. आठवडय़ाच्या शनिवार-रविवारी शहराचा पाणीपुरवठा बंद राहत असल्याने पुढील दोन ते तीन दिवस रहिवाशांना मुबलक पाणी मिळणे अशक्य होते. त्यामुळे सोसायटी, चाळी, झोपडपट्टय़ांमधील रहिवासी पाणी पुरवठा विभागात ३२० रुपयांची पावती फाडून पाण्याच्या टँकर्सची अधिकृतपणे मागणी करतात. प्रत्येक रहिवाशाची पाण्याच्या टँकर्सची पाण्याची मागणी असल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभांवरील महापालिकेच्या नियंत्रकाकडे प्रत्येक दिवशी सरासरी १०० ते २०० पावत्या जमा होत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दिवसभरात टँकरचालक शहरात १० ते १५ फेऱ्या मारतो. त्यामुळे एकाच दिवशी सर्वच रहिवाशांना पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामुळे काही ठिकाणी टँकरचालकासोबत साटेलोटे करून पाण्याची परस्पर खरेदी केली जात असल्याचे प्रकार पुढे येऊ लागले आहेत. यासाठी जादा पैसे मोजले जात आहेत, असे काही रहिवाशांनी सांगितले.
जलकुंभावर पावत्या जमा करणारा एक कर्मचारी असतो. तेथे पालिकेचा पाणीपुरवठा विभागाचा एकही अधिकारी उपस्थित नसतो. त्यामुळे त्यांना जलकुंभांवर सुरू असलेला गैरप्रकार निदर्शनास येत नाही. एका टँकरचालकाने दिवसभरात चार ते पाच फे ऱ्या मारल्या तरी चालकाला पाच हजार रुपयांची कमाई चोरीच्या पाणीपुरवठय़ातून होत आहे. पालिका अधिकाऱ्यांशी ठेकेदारांची सलगी असल्याने त्यांना पाठीशी घालण्यात येत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला.
- पालिका हद्दीत एकूण २० ते २५ खासगी टँकर
- एक टँकर दररोज नऊ ते दहा फेऱ्या मारून पाणीपुरवठा करतो
- घरगुती वापरासाठी पाणी दर ३२० रुपये, वाणिज्य वापरासाठी दर ६२० रुपये
- मार्च २०१५ ते डिसेंबर २०१५ या कालावधीत
- पालिकेच्या ‘ब व क’ प्रभागात ९ टँकरच्फा एकूण ११ हजार ६६६ फेऱ्या.
- ‘अ’ प्रभागात तीन टँकरद्वारे ४ हजार ३३९ फेऱ्या.
पालिकेच्या सेवेत असलेला कोणताही खासगी ठेकेदाराचा टँकर चालक खासगीरीतीने पाणी विकत असेल, तर त्या टँकरचा वाहन क्रमांक, त्याने कोणत्या सोसायटीला खासगीत टँकर विकला. याची सविस्तर माहिती पाणीपुरवठा विभागात केली तर, तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येऊन संबंधित टँकरचालकाकडून दंडासह रक्कम वसूल केली जाईल आणि संबंधित ठेकेदाराचा तो टँकर सेवेत ठेवायचा की नाही याचाही प्रशासन विचार करील.
– तरुण जुनेजा, कार्यकारी अभियंता, कडोंमपा