लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: मुसळधार पावसामुळे कल्याण, डोंबिवली शहरातील बुहतांशी रस्ते, भाग जलमय झाले आहेत. रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी झाली आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा मुसळधार पावसात बंद पडतात. त्यामुळे रिक्षा चालक घरी निघून गेल्याने रेल्वे स्थानक भागातून घरी जाण्याच्या तयारीत असलेल्या प्रवाशांची कुचंबणा होत आहे.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
mumbai lhb coaches train
कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर
Dombivli railway station work
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट एक-ए वरील सरकता जिना, उतार वाट रेल्वे पुलाच्या कामासाठी बंद
youth killed in bike accident in pune
बोपदेव घाटात दुचाकी घसरुन सहप्रवासी तरुणाचा मृत्यू
Dombivli water to Thane, Conspiracy, eknath shinde news, eknath shinde latest news,
डोंबिवलीचे पाणी छुप्या पद्धतीने ठाण्याला पळविण्याचे षडयंत्र, मनसेचे उमेदवार राजू पाटील यांचा मुख्यमंत्री पिता-पुत्रावर घणाघात
brothers beaten up, Dombivli Kachore,
डोंबिवली कचोरे येथे पेटलेला सुतळी बॉम्ब अंगावर फेकण्याच्या वादातून दोन भावांना मारहाण

कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक भागातील रिक्षा वाहनतळांवरील रिक्षांची संख्या तुरळक आहे. रिक्षा पकडण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडत आहे. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील पाटकर, डाॅ. राॅथ, नेहरु रस्ता पाण्याखाली गेले आहेत. या भागातील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली आहेत. लोकल अनियमित वेळेत धावत आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांचा शुकशुकाट आहे.

हेही वाचा… मुंबई-नाशिक महामार्गावर वासिंद, आसनगाव येथील दररोजच्या वाहतूक कोंडीने प्रवासी हैराण

डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा, भोपर, नांदिवली, २७ गाव परिसरातील आडिवली ढोकळी, पी ॲन्डी टी काॅलनी, आयरे, कोपर परिसरातील काही भाग जलमय झाले आहेत. काही चाळींमध्ये पाणी घुसले आहे. काही रहिवाशांनी कोपर रेल्वे स्थानकात तात्पुरता आसरा घेतला आहे. डोंबिवली पश्चिमेत महात्मा फुले रस्त्यावर पाणी तुंबले आहे.गणेशनगर, देवीचापाडा, मोठागाव, कोपर मधील सखल भागात पाणी साचले आहे.

एमआयडीसी भागात काँक्रीट रस्ते कामांमुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या आहेत. निवासी, औद्योगिक भागातील काही परिसर जलमय झाला आहे. कल्याण पूर्वेतील चिंचपाडा, खडेगोळवली, विठ्ठलवाडी पूर्व भागातील रस्ते जलमय झाले आहेत. या भागातील रस्ते वाहतूक पूर्ण बंद आहे. नागरिक एकमेकांना आधार देत या पाण्यातून वाट काढत जात आहेत. विठ्ठलवाडी नाल्याचे पाणी कल्याण पूर्वेच्या विविध भागात शिरले आहे.

हेही वाचा… मुंबई लोकल ट्रेन सेवा ठप्प; बदलापूर- अंबरनाथ मधील रेल्वे रुळांचे जलमय Video पाहा

कल्याण पश्चिमेत दुर्गाडी किल्ला परिसर, बाजारपेठ भागात उल्हास नदीची पाण्याची पातळी वाढल्याने या नदीच्या काठी राहणारे रहिवासी, तबेले मालक सतर्क झाले आहेत. वालधुनी नदी काठच्या भागात पुलाचे पाणी घुसले आहे. शहाड उड्डाण पूल भागात नेहमीप्रमाणे पावसाचे पाणी तुंबले आहे. वर्दळीच्या रस्त्यावर पाणी तुंबल्याने या भागातील मुरबाडकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

शिळफाटा रस्ता दोन फुटाने उंच बांधण्यात आल्याने यावेळी खळगे असलेल्या भागात पाणी तुंबण्याचे प्रकार घडले आहेत. काँक्रीटीकरणाचे काम सुरू असताना दोन वर्षापूर्वी शिळफाटा रस्ता मुसळधार पावसात तीन दिवस जलमय राहत होता. कल्याण-भिवंडी रस्ता कोनपासून ते बाह्यवळण रस्त्यापर्यंत जलमय झाला आहे. या भागातील दुकाने, बाजारपेठा बंद आहेत.

हेही वाचा… बदलापुरहून मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा ठप्प; कुळगाव बदलापूर नगरपालिकेतर्फे सतर्कतेचा इशारा

शहराच्या वेशीवर झालेली बेकायदा बांधकामे, नवीन वसाहती यामुळे शहरातून पावसाचे पाणी वाहून नेणारे स्त्रोत घटले आहेत. त्यामुळे हे पाणी वाट मिळेल ते निघून जाते किंवा जागीच थांबते. त्यामुळे कल्याण, डोंबिवली शहरे थोडा पाऊस पडला तरी आता जलमय होऊ लागली आहेत, असे एका जाणकाराने सांगितले.

उल्हास नदीने बदलापूर, मोहने आणि जांभूळपाडा येथील धोक्याच्या पातळ्या ओलांडल्या आहेत. मुसळधार पाऊस सुरूच राहिला तर पुराचे पाणी कल्याण, डोंबिवली शहरांच्या खाडी किनारच्या वस्तीत घुसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.