महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरुद्ध राष्ट्रवादी असं शाब्दिक युद्ध सुरु असल्याचं चित्र दिसत आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा तसेच १२ तारखेला घेतलेल्या उत्तर सभेमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जातीपातीच्या राजकारणाचे गंभीर आरोप केले. यानंतर खुद्द शरद पवार आणि राष्ट्रवादीकडून यासंदर्भात प्रतिक्रिया देत मनसेवर निशाणा साधण्यात आला. असं असतानाच आता या वादासंदर्भात मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी एक मोठं विधान केलं आहे. शरद पवारांसारखा मोठा नेता राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर देतो याचा आम्हाला आनंद असल्याचं नांदगावकर यांनी म्हटलंय.

नक्की वाचा >> “ब्लु प्रिंट, विकासाच्या कल्पना मशिदींवरील भोंगे, मदरश्यांवर येऊन थांबतात तेव्हा…, राज ठाकरे म्हणजे…”; MNS नेत्याची राजीनाम्याची पोस्ट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शरद पवारांसहीत राष्ट्रवादीचे सर्वच नेते प्रतिक्रिया देत आहेत, त्यासंदर्भात काय सांगाल असा प्रश्न पत्रकारांनी नांदगावकर यांना विचारला. त्यावर उत्तर देताना, “इतर नेत्यांनी प्रतिक्रिया देणं आणि पवारांनी प्रतिक्रिया देणं यात फरक आहे. पवार हे कोणालाही प्रतिक्रिया देत नाहीत. एकंदरित गुढीपाडव्याची सभा झाल्यानंतर पवारांनी पत्रकार परिषद घेऊन त्यावर उत्तर दिलं. पुन्हा परवा सभा झाली त्यावरही पवारांनी उत्तर दिलं. याचा अर्थ पवारांचं फार बारकाईने राज ठाकरेंवर, मनसेवर आणि इंजिनावर लक्ष आहे. त्यांना दिसतंय की इंजिन आता फास्ट निघालेलं आहे. त्यामुळेच ते एवढी दखल घेत आहेत. त्याचा आम्हाला आनंद आहे,” असं उत्तर नांदगावकर यांनी दिलं.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: …अन् वसंत मोरे राज ठाकरेंच्या पाया पडले; ‘शिवतीर्थ’वरील बैठकीमधील Inside Photos पाहिलेत का?

गुरुवारी डोंबिवलीमध्ये मनसे आमदार राजू पाटील यांच्या पुतणीच्या लग्नासाठी राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे ,मनसे नेते अमित ठाकरे, मनसे नेते बाळा नांदगावकर आले होते. अनेक दिग्गजांनी या लग्नाला हजेरी लावली होती. याचवेळी नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.