उल्हासनगर मधील एक कुटुंब कल्याण शिळफाटा रस्त्यावरील खिडकाळी गावातून लग्न समारंभ आटोपून घरी परतत होते. त्यांना जुन्या भांडणाचा राग मनात धरुन डोंबिवलीतील १० जणांनी वाहन अडवून मंगळवारी बेदम मारहाण केली. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> कल्याण जवळ रस्ते अपघातात मरण पावलेल्या तरुणाच्या कुटुंबियांना ३५ लाखाची भरपाई

यामधील खरे मारेकरी डोंबिवली पूर्व पाथर्ली भागातील रहिवासी आहेत. परशा जुम्मा इरगादिल, राम नागेश पवार, सुनील शंकर पवार आणि इतर आठ जण अशी आरोपींची नावे आहेत. बाबू लक्ष्मण धोत्रे (३३, रा. गायकवाड पाडा, चक्की सेक्शन, उल्हासनगर) असे तक्रारदाराचे नाव आहे. ते रिक्षा चालक आहेत.

हेही वाचा >>> ठाणे जिल्ह्यात मोटार सायकली चोरणारे अटकेत ; ११ मोटार सायकल, सोन्याचा ऐवज हस्तगत

पोलिसांनी सांगितले, बाबू धोत्रे हे रिक्षा चालक आपल्या चुलत भावाच्या बहिणीचे लग्न लावून खिडकाळी देसई गाव येथून उल्हासनगर येथे दुपारी तीन वाजता परत जात होते. त्यांचे वाहन निळजे रेल्वे उड्डाण पुलाजवळ येताच तेथे दबा धरुन बसलेल्या दहा जणांनी त्यांचे वाहन अडविले. जुन्या भांडणाचा विषय उकरुन काढून वाहनातील व्हराडींना बेदम मारहाण केली. तक्रारदार बाबू हे वाद सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. मारहाणीसाठी लाकडी दांडके, स्टम्प यांचा वापर करण्यात आला.

Story img Loader