ठाणे : गेल्याकाही वर्षांमध्ये ठाणे शहरात नागरिकरण वाढले असताना त्यासोबतच अपघातांचे केंद्रही आता वाढू लागले आहे. मागील वर्षी अर्थात २०२४ मध्ये तब्बल २३० जणांना आपले प्राण अपघातात गमवावे लागले. यामध्ये दुचाकी चालक आणि पादचाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. रस्ते ओलांडताना हे अपघात होत असतात. असे असले तरी पादचाऱ्यांना रस्ते ओलांडण्यासाठी पुरेशी यंत्रणा नाही. काही ठिकाणी भुयारी मार्ग आहेत. परंतु त्याचा वापरच पादचाऱ्यांकडून केला जात नाही. त्यामुळे आता शहरातील मुख्य चौक अपघाताचे केंद्र ठरत असल्याचे चित्र आहे. घोडबंदर भागातील आनंदनगर भागात नागरिकांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. त्यामुळे प्रशासनाने तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी कायम स्वरूपातील उपाययोजनांकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहेत.

ठाणे शहरात एकेकाळी जंगलाचा भाग असलेला घोडबंदर भाग मागील १५ ते २० वर्षांत पूर्णत: बदलला आहे. या भागात झपाट्याने नागरिकरण झाले. मुंबईच्या तुलनेत कमी किमतीत घरे मिळत असल्याने या भागात नागरिकांनी इमारतींमध्ये गृह खरेदी केली. तर जुने ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीन हात नाका, नौपाडा, पाचपाखाडी भागात टाॅवर उभे राहू लागले आहे. जुन्या ठाण्यातून कोपरी ते माजिवडापर्यंतचा पूर्व द्रुतगती महामार्ग जातो. या महामार्गाच्या एकाबाजूला नौपाडा, पाचपाखाडी, खोपट तर दुसऱ्या बाजूला वागळे इस्टेट, वर्तकनगर असा परिसरत आहे. ठाण्यातील वस्ती वाढत असताना आता हे मार्गातील चौक, मुख्य रस्ते धोक्याचे ठरू लागल्याचे चित्र आहे.

Sant dyanshwaranchi muktai
संत मुक्ताईंच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Following Pushpa Agashes accidental death another elderly persons death occurred near Nitin Company area
आगाशे प्रकरणानंतर महामार्गावर रस्ता ओलांडत असताना आणखी एका वृद्धाचा अपघाती मृत्यू
Prakash Abitkar is now the focus of Kolhapur politics
कोल्हापूरच्या राजकारणात आबिटकरांचे प्रकाशपर्व!
19 to 20 people die in road accidents every month
ठाणे : प्रत्येक महिन्यात १९ ते २० जणांचा रस्ते अपघातात मृत्यू
aaditya thackeray (1)
Maharashtra News : देवेंद्र फडणवीसांच्या दावोस दौऱ्याबाबत आदित्य ठाकरेंचं सूचक विधान; म्हणाले, “काही गोष्टी लवकरच समोर येतील”
Two youths die in separate accidents in Pune city
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू
Three gawali brothers from Kalyan East were exiled from Thane Mumbai and Raigad districts for two years
कल्याण पूर्वेतील तीन भाऊ दोन वर्षासाठी ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यातून तडीपार

घोडबंदर येथील ओवळा, आनंदनगर, डी-मार्ट चौक आणि कासारडवली हे मार्ग चौक वाहतुकीसाठी महत्त्वाचे आहेत. परंतु हे चौक पार करताना नागरिकांच्या नाकी नऊ येते. आनंदनगर भागात एका दिशेला दोन शाळा आहेत. त्यामुळे रस्ता ओलांडण्यासाठी शाळकरी मुलांना तारेवरची कसरत करावी लागते. काही पालकांनी विद्यार्थ्यांचा अपघात होऊ नये म्हणून भितीपोटी आनंदनगर रस्ता ओलाडण्यासाठी शाळेच्या बसगाडीचे शुल्क भरले आहेत. तर काही विद्यार्थी सायकलने जीवघेणा प्रवास करताना दिसतात. दुचाकीने रस्ता ओलांडणाऱ्या वाहन चालकांना देखील धोकादायकरित्या ये-जा करावी लागते. घोडबंदर पट्ट्यातील नागरिक आनंदनगर जवळील डी-मार्टमध्ये खरेदीसाठी जात असतात. येथेही त्यांना जीवघेण्या पद्धतीने रस्ता ओलांडावा लागतो. या भागात काही मीटर अंतरावर नव्याने पादचारी पूल उभारण्यात आला आहे. परंतु तो डीमार्ट पासून लांब आहे. त्यामुळे त्याचा वापर होणार नसल्याचा दावा येथील स्थानिकांनी केला. ओवळा, कासारवडवली आणि गायमुख भागातही रस्ते आणि चौकातून ये-जा करताना नागरिकांना जीवावर बेतण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कापूरबावडी आणि माजिवडा चौकात देखील अशीच स्थिती आहे. कापूरबावडी चौक हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या चौकातून पूर्व द्रुतगती महामार्गाने बाळकूम, भिवंडी, काल्हेर, हायलँड, ढोकाळी, कोलशेत मार्गाची वाहने वाहतुक करतात. या मार्गावरून जड वाहनांचीही वाहतुक असते. तसेच या भागात काही आस्थापना आहेत. तेथे काम करणारे कर्मचारी ये-जा करत असतात. कोलशेत, हायलँड, ढोकाळी भागात नागरी वस्ती वाढली आहे. येथेही धोकादायकरित्या नागरिक रस्ता ओलांडताना दिसतात. अनेकदा वाहन चालक बेदरकारपणे वाहन चालवित असल्याने अपघाताची भिती निर्माण होते. माजिवडा चौकातही मुंबई नाशिक महामार्ग, गोकुळनगर, ठाणे स्थानक, कापूरबावडी, माजिवडा येथील वाहनांचा भार असतो. येथे अनेकदा वाहन चालकांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवितात.

पूर्व द्रुतगती महामार्गावरील कॅडबरी जंक्शन भागात लोकवस्ती आणि व्यावसायिक दुकाने आहेत. या भागात नागरिक रस्ता ओलांडून दुसऱ्या दिशेला ये-जा करतात. परंतु कॅडबरी सिग्नल परिसरात रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी पूल नसल्याने नागरिकांना गजबजलेल्या चौकातूनच रस्ता ओलांडावा लागतो. सिग्नल यंत्रणा उपलब्ध असली तरी येथून वाहनांची वर्दळ अधिक असते. अवजड वाहने देखील येथूनच वळण घेत घोडबंदरला जातात.

नितीन कंपनी या चौकात रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग तयार केला आहे. परंतु भुयारी मार्गिकेत अस्वच्छता असते. तसेच जीने चढ-उतर करावे लागत असल्याने हा भुयारी मार्ग पादचाऱ्यांसाठी वेळ काढू ठरत असल्याच्या तक्रारी आहेत. अवघे काही सेकंद वाचविण्यासाठी नागरिक येथील भुयारी मार्गाऐवजी मुख्य चौकातून रस्ता ओलांडत असतात.

तीन हात नाका भागात सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आगाशे यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर येथील चौकातील व्यवस्थेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. नौपाडा, लाल बहादूर शास्त्री चौक, नितीन कंपनी, सेवा रस्त्यावरील वाहतुक असे एकूण सात ते आठ रस्ते या चौकात जोडले गेले आहेत. येथे थांब रेषा आखली आहे. पोलीस देखील नियंत्रणासाठी उपस्थित असतात. परंतु त्यांची संख्या अपुरी ठरते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नितीन कंपनी परिसरापासून तीन हात नाका आणि नितीन कंपनी चौक अतिशय जवळ आहेत. पूर्व द्रुतगती महामार्ग त्यांच्या निवासस्थानाजवळून जातो. शिंदे हे मुख्यमंत्री असताना वाहतुक पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानाजवळ वाहतुक बदल केले होते. परंतु ते बदल फोल ठरत असल्याचे चित्र आहे.

घोडबंदर भागात रस्ता ओलांडताना नागरिकांना जीव मुठीत घ्यावा लागतो. घोडबंदर भागातील सेवा रस्ते मुख्य रस्त्यात विलणीकरण केले जाणार असल्याने समस्या आणखी वाढू शकते. चौकात थांब रेषा, झेब्रा क्राॅसिंगचे रंग काळपट झाले आहेत. वाहन चालकही सिग्नल यंत्रणेचे पालन व्यवस्थित करत नाही. पोलिसांसोबत बैठक झाल्यानंतर येथे वाहतुक पोलिसांचे साहाय्यक आणि आम्ही नागरिक जनजागृती करत असतो. प्रशासनाने येथे तात्पुरत्या उपाययोजना ऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. गिरीश पाटील, रहिवासी, घोडबंदर.

अपघात टाळण्यासाठी वाहतुक विभागाकडून जनजागृती केली जाते. वाहन चालकांनी नियमांचे उल्लंघन करून वाहतुक करू नये. अन्यथा अपघात होऊ शकतो. पादचाऱ्यांनी झेब्रा क्राॅसिंगचा वापर करून रस्ते ओलांडावा. तसेच रस्ता ओलांडताना मोबाईल वापरणे टाळावे. – पंकज शिरसाट, उपायुक्त, वाहतुक शाखा.

Story img Loader