ठाणे : खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे, तर उद्धव ठाकरे गटाचे बारा आमदार अपात्र का केले नाही. विधानसभा अध्यक्षांवर कोणाचा दबाव आहे का असा प्रश्न शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला आहे. तसेच संपूर्ण निकाल पत्रिका वाचून त्यापुढील धोरण आम्ही ठरवणार आहोत असे देखील त्यांनी सांगितले.
शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिका आणि विधीमंडळातील शिवसेना पक्षाबाबतचा निकाल विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिला. या निर्णयात सर्वच आमदारांना पात्र ठरविले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विधीमंडळ पक्ष असल्याचाही निकाल देण्यात आला. बुधवारी सकाळपासूनच शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी निकालाच्या प्रतिक्षेत होते. पक्षाबाबत निकाल लागताच, आनंद आश्रमात शिंदे गटाने जल्लोष साजरा केला. तसेच एकमेकांना पेढे भरविले. यावेळी महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आनंद आश्रमाबाहेरही रोषणाई करण्यात आली होती. परंतु सर्वच आमदारांना पात्र केल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रश्न उपस्थित केले.
हेही वाचा : एकनाथ शिंदेंचे सर्व आमदार पात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा मोठा निर्णय
खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे, तर उद्धव ठाकरे गटाचे बारा आमदार अपात्र का केले नाही. विधानसभा अध्यक्षांवर कोणाचा दबाव आहे का असा प्रश्न नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला आहे. तसेच संपूर्ण निकाल पत्रिका वाचून त्यापुढील धोरण आम्ही ठरवणार आहोत असे देखील त्यांनी सांगितले.