ठाणे – नवी मुंबई, मुंबई तसेच ठाणे शहरात मागील काही दिवसांपासून सोनेरी कोल्ह्यांचे (गोल्डन जॅकल) वारंवार दर्शन होऊ लागले आहे. मानवी वस्तीत दिसणाऱ्या या दुर्मिळ प्राण्याला पाहून नागरिकांमध्ये कुतुहलाचे वातावरण असले, तरी पर्यावरण अभ्यासक, संस्था तसेच प्राणी मित्रांच्या म्हणण्यानुसार ठाणे, नवी मुंबई येथील कांदळवन क्षेत्र हे सोनेरी कोल्ह्याचे पुर्वीपासूनचे निवासस्थान असल्याचे सांगितले जात आहे.

ठाणे, नवी मुंबई ही शहरे पाणथळ जागा आणि कांदळवन क्षेत्रासाठी ओळखली जातात. मानवी वस्तीने गजबजलेल्या या शहरांमध्ये विविध पशु – पक्ष्यांच्या प्रजाती आढळून येतात. या शहरांमध्ये सुरू असलेल्या शहरीकरणाला तोंड देत अनेक वन्यप्रजाती तेथे वास्तव्य आहे. त्यातील एक म्हणजे सोनेरी कोल्हा. हा कोल्हा युरोप, आफ्रिका, आशियाच्या काही भागात आढळतो. त्याचप्रमाणे कांदळवन क्षेत्र हे सोनेरी कोल्ह्यांचे अधिवासाचे मुख्य स्थान असल्याचे प्राणी अभ्यासकांकडून सांगण्यात आले आहे. सोनेरी कोल्हा कांदळवन परिसंस्थेतील प्रमुख सस्तन प्राणी आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई शहरात सध्या त्याचे वारंवार दर्शन होत आहे. घाटकोपर येथील उद्यचंद केंद्र – ऐरोली तसेच ठाणे क्रिकपासून पासून फ्लेमिंगो सेंच्युरी या भागात या कोल्ह्यांचे वास्तव्य मोठ्या संख्येने आहे. हे कोल्हे आपले भक्ष्याच्या शोधात अनेकदा मानवी वस्तीत प्रवेश करतात. साधारणत: रात्रीच्यावेळेत यांचे दर्शन होते. या प्राण्याला पाहून नागरिकांना कुतुहल वाटत असले तरी, मानवी वस्तीत वारंवार दिसणारे सोनेरी कोल्हे पाहुणे नसून कांदळवन हे त्यांचे पुर्वीपासूनचे निवासस्थान असल्याचे स्पष्ट मत प्राणी अभ्यासकांकडून व्यक्त केले जात आहे.

Suresh Dhas
Suresh Dhas : “माणसं मारायला लागल्यावर त्याचं समर्थन करायचं का?”, वाल्मिक कराडची भेट घेतल्याच्या दाव्यावर सुरेश धस स्पष्टच बोलले
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Walmik Karad Mother Parubai Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “आता मी मेल्यावर पाणी पाजायला…”
PM Modi
PM Narendra Modi : “विस्तारवाद नाही, विकासवादाच्या भावनेने काम सुरू”, मुंबईत युद्धनौका आणि पाणबुडीचे उद्घाटन केल्यानंतर मोदींची प्रतिक्रिया
bhaskar jadhav and uday samant
Uday Samant : “शिवसेनेची काँग्रेस झालीय”, भास्कर जाधवांच्या विधानावर उदय सामंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मोठ्या नेतृत्त्वाचं…”
What Ajit Pawar Said?
Ajit Pawar : धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणार का? विचारताच अजित पवारांचं उत्तर, “मी इतकं स्पष्ट सांगतो….”
Ravi Raja Joins Bjp and Left Congress
Ravi Raja : मुंबईत काँग्रेसला धक्का! रवी राजा यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
Amit Thackeray on Eknath Shinde
Amit Thackeray : “धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली”, शिवसेनेतील बंडखोरीवरील अमित ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत!

हेही वाचा >>>उल्हासनगर: भिक्षा मागण्याच्या बहाण्याने चोरी; सीसीटीव्हीच्या आधारे दोन महिलांना अटक

आपल्याकडे फार पुर्वीपासून कोल्ह्यांचे वास्तव्य असल्याचे नागरिकांना माहित नाही. कांदळवन क्षेत्रात त्यांचे वास्तव्य असले, तरी सध्या ते मोठ्या प्रमाणावर मानवी वस्तीत येऊ लागले आहेत. कांदळवन क्षेत्रात असणारे पाणी दुषित झाल्याने अथवा त्यांचे खाद्य कमी झाल्याने कोल्हे बाहेर येत आहेत. तसेच कांदळवन क्षेत्रापासून जवळ असणाऱ्या मानवी वस्ती बाहेर जो कचरा असतो, त्यात विना मेहनत खाद्य उपलब्ध होत असल्याने कोल्ह्यांचा मानवीवसतीतील वावर वाढला असल्याचे रॉ संस्थेचे व्यवस्थापन समिती सदस्य तथा वरिष्ठ बचाव पथक सदस्य महेश इथापे यांनी सांगितले.

विकासाबरोबरच संवर्धन गरजेचे आहे. निसर्गात जे प्राणी आढळतात ते सगळे महत्वपुर्ण आहेत. कांदळवन क्षेत्रात सर्वात जास्त संख्या सोनेरी कोल्ह्यांची आहे. त्यांचे संवर्धन गरजेचे आहे. कारण मोठ्या प्रमाणावर असलेली प्रजात जर टिकली तर इतर प्रजातींमध्ये समतोल राहिल. या प्राण्यांचे संरक्षण वनविभाग आणि प्राणी संस्थांचेच काम नसून सर्व नागरिकांनी मदत करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया मानद वन्यजीव रक्षक वन विभाग, मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या महाराष्ट्रातील प्राणी कल्याण कायदा निरीक्षण समितीचे सदस्य तथा रॉ संस्थेचे अध्यक्ष, संस्थापक ॲड पवन शर्मा यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.

हेही वाचा >>> Nashik Highway Accident : मुंबई नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा भीषण अपघात, तीन जण जागीच ठार

नवी मुंबई, ठाणे या शहरांना नैसर्गिक अधिवास लाभला आहे. यात अनेक वन्यजीव असल्याचे पाहायला मिळते. त्या कांदळवनात प्रामुख्याने सोनेरी कोल्हे आहेत. लोकवस्ती असणाऱ्या ठिकाणी कोल्हे दिवसा बाहेर येत नसून ते रात्री दिसून येतात. सोनेरी कोल्हे, बिबट्यासारखे प्राणी जैवविविधतेचा भाग आहेत. ते मानवी वस्तीलग असणाऱ्या कांदळवन, जंगल परिसरात वास्तव्य करतात. अनेक अडचणींवर मात करत, शहरातील बदलांना सामोरे जाऊन ते जगत आहेत. या शहरी जैवविविधतेच्या अस्तित्वाची दखल घेण्याची गरज असल्याचे वाईल्डलाईफ कन्झर्वेशन सोसायटी इंडियाचे वन्यजीव शास्त्रज्ञ निकित सुर्वे यांनी सांगितले.

Story img Loader