पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्य़ामधील एका २४ वर्षीय विवाहितेची मुंबईत ५० हजाराला विक्री करून तिला वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या पाच जणांविरोधात शनिवारी भिवंडी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. त्यापैकी एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. दार्जिलिंग जिल्ह्य़ातील एका गावात राहणारी पीडीत महिला कामाच्या शोधात होती. गावातील परिचित सीमा बाला हिने मुंबईत नोकरी लावते, असे सांगून संजय अली याच्याशी तिची ओळख करून दिली. त्याने महिना १० ते १२ हजार रुपये घरकामाची नोकरीचे आमिष दाखवून मुंबईतील नाहूर भागात आणले. तेथे सलमान व त्यांच्या पत्नीला ५० हजार रुपयांना विकले. या दोघांनी तिला एका घरात डांबून ठेवले व तिला वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच भिवंडी शहर पोलिसांनी धाड टाकून पीडीत महिलेची सुटका केली. तसेच याप्रकरणी पाचजणांविरोधात गुन्हा दाखल करत नीला नायक या महिलेला अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा