डोंबिवली – आम्ही तुम्हाला श्रीरामाचे दर्शन घडवून आणतो, असे एका जेष्ठ नागरिक महिलेला सांगून तीन भामट्यांनी ज्येष्ठाची बुधवारी फसवणूक केली आहे.कल्याण पश्चिम येथील खडकपाडा भागातील लोटस डेंटल केअर सेंटर येथेही फसवणुकीची घटना घडली आहे.

तक्रारदार महिला बुधवारी दुपारी खडकपाडा भागातून पायी चालल्या होत्या . यावेळी त्यांना तीन भामट्यांनी अडवले. आम्ही राम भक्त आहोत. आम्ही तुम्हाला प्रभू रामचंद्रांचे दर्शन घडवून आणतो. यासाठी तुम्ही तुमच्या हातातील सोन्याच्या बांगड्या, इतर सोन्याचा ऐवज पिशवीत गुंडाळून ठेवा, असे भामट्यांनी महिलेला सांगितले.

हेही वाचा >>>पोखरण रोड भागातील हजारो लघु उद्योजकांना दिलासा; नवे रोहित्र आणि विद्युत वाहिन्याही भूमिगत

भामट्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदार महिलेने जवळील दोन लाख 66 हजाराचा सोन्याचा ऐवज पिशवीत गुंडाळला. हा ऐवज कुणी चोरू नये म्हणून भामट्यांनी स्वतःजवळ घेतला. आपणास रामाचे दर्शन होत आहे या आनंदात महिला होती. तेवढ्यात तिन्ही भामट्यांनी महिलेला एकाएकी सोडून तिथून पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

Story img Loader