लोकसत्ता खास प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
डोंबिवली: येथील पूर्व भागातील नांदिवली टेकडी भागात एका मोटार चालकाने निष्काळजीपणाने, भरधाव वेगाने मोटार चालवून एका पादचारी महिलेला जोराची धडक दिली. या धडकेत महिलेच्या डोक्याला, छातीला गंभीर दुखापती झाल्याने तिचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री आठ वाजता नांदिवली टेकडी येथील भवानी स्वीट्स दुकानासमोरील रस्त्यावर हा प्रकार घडला.
पूनम जगन्नाथ दुबळे (५३) असे मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. त्या अंबरतीर्थ सोसायटी, नांदिवली टेकडी भागात राहत होत्या. मोटार कार चालक महेंद्र सदाशिव चव्हाण (३३) याच्या विरुध्द पूनम यांचा नातेवाईक सचीन चंद्रकांत मेंगे (३५) यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
आणखी वाचा-कल्याणमध्ये पत्नीला गळफास देऊन ठार मारण्याचा प्रयत्न, फरार पतीचा पोलिसांकडून शोध
पोलिसांनी सांगितले, मयत पूनम शुक्रवारी रात्री बाजारात वस्तू खरेदी करून पायी नांदिवली टेकडी भागातून घरी चालल्या होत्या. नांदिवली टेकडी येथील भवानी स्वीट्स दुकानासमोरील रस्त्याच्याकडेने जात असताना अचानक त्यांच्या पाठीमागून मोटार कार वेगाने आली. या मोटारीची धडक पूनम यांना बसली. त्या जागीच कोसळल्या. कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या महिलेला पादचाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात नेले. परंतु, उपचार सुरू होण्यापूर्वीच ती मरण पावली. चालक महेंद्र यांच्या निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.