एचडीएफसी बँकेच्या क्रेडीट कार्डच्या माध्यमातून भुरट्यांनी कल्याण मध्ये राहत असलेल्या सिमेंन्स कंपनीतील एका नोकरदार महिलेची ऑनलाईन माध्यमातून एक लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.सुजाता जितेंद्र पांडव असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या नवी मुंबईतील ऐरोली येथील सिमेन्स कंपनीत नोकरी करतात. त्या कल्याण मधील खडकपाडा भागात राहतात. या फसवणूक प्रकरणी सुजाता यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>अंबरनाथः वालधुनी नदीवर फेसाळ थर; रासायनिक सांडपाण्यामुळे फेस आल्याचा संशय

पोलिसांनी सांगितले, सुजाता पांडव या एचडीएफसी बँके्च्या खातेदार आहेत. या बँकेचे क्रेडीट कार्ड सुजाता यांच्याकडे आहे. क्रेडीच कार्डची मुदत संपल्याने एचडीएफसी बँकेने सुजाता यांना त्यांच्या घऱच्या पत्त्यावर नवीन क्रेडीट कार्ड पाठविणार असल्याचे कळविले होते. हे कार्ड टपालातून घरी येण्यापूर्वीच सुजाता यांच्या क्रेडीट कार्डचा भामट्याने चलाखीने वापर करुन त्यांच्या एचडीएफसी बँकेतील खात्यामधून एक लाख ६८ हजार रुपये परस्पर स्वताच्या बँक खात्यात वळते केले. या व्यवहाराची माहिती मिळताच सुजाता यांनी बँकेशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांना हा ऑनलाईन व्यवहार क्रेडीट कार्डच्या माध्यमातून झाला आहे. नवीन क्रेडीट कार्डचा भामट्याने बेमालुमपणे वापर करुन आपली फसवणूक केल्याने सुजाता यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल करुन घेतला आहे.