ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील मानेखिंड भागातील झापवाडी येथे शनिवारी संध्याकाळी अंगावर वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. या विजेचा झटका एका बैलाला बसल्याने त्याचाही जागीच मृत्यू झाला. ही माहिती मिळताच शहापूरचे आ. दौलत दरोडा यांनी मृत महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> कळव्यात घराच्या छताचे प्लास्टर पडून दोघे जखमी

कान्हु मोंडुला असे मयत महिलेचे नाव आहे. शहापूर तालुक्यातील किन्हवली जवळील झापवाडी आदिवासी पाड्यावर कान्हु मोंडुला आपल्या कुटुंबीयांसह राहत होत्या. शनिवारी संध्याकाळी त्यांनी घरातील गाई, बैल चरण्यासाठी पाड्या जवळील जंगलात नेले होते. संध्याकाळी मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. कान्हु एका झाडाचा आसरा घेऊन त्याखाली बसल्या होत्या. त्याचवेळी विजांचा जोराचा कडकडाट होऊन वीज कान्हु यांच्या अंगावर आणि जवळच चरत असलेल्या बैलाच्या अंगावर पडली. त्यामुळे कान्हु जागीच मरण पावल्या. बैलाचा जागीच मृत्यू झाला.
आदिवासी पाड्यावरील जंगलात गाई चरण्यासाठी नेलेल्या गोरक्षकाला ही माहिती मिळाली. त्याने कान्हु जवळ येऊन पाहिले तर ती मृत झाली होती. त्याने ही माहिती तातडीने आदिवासी वाडीवर दिली. तात्काळ गावकरी घटनास्थळी आले. पोलीस, महसूल अधिकाऱ्यांना ही माहिती देण्यात आली. या घटनेचा स्थानिक सरपंच यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. आ. दौलत दरोडा यांना ही माहिती मिळताच त्यांनी रविवारी कान्हु मोंडुला यांच्या घरी येऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांना आर्थिक मदतीचा धनादेश दिला. यावेळी ज्येष्ठ शिवसेना पदाधिकारी किसन पडवळ, मानेखिंड गावचे उपसरपंच अशोक सपाट, ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा >>> ठाणे जिल्ह्यात जनावरांना होणाऱ्या लंपीचा शिरकाव नाही

येणारे काही दिवस पाऊस, विजांचा गडगडाट यांचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे आदिवासी पाड्यावरील, गावातील गोसेवकांनी काही दिवस गाई, गुरे दुपारी जंगलातून घरी आणावीत. संध्याकाळी त्यांना गोठ्यात चारा आणून घालावा. संध्याकाळी शक्यतो जंगलात जाणे टाळावे, असे आवाहन आ. दरोडा यांनी ग्रामस्थांना केले.