कळवा – खारेगाव मच्छी मार्केट परिसरात रविवारी रात्री पालिकेच्या ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी खणलेल्या खड्डय़ात पडून एका ७० वर्षीय वृध्देचा मृत्यू झाल्याची घटना घडली.    खारेगाव येथे राहणाऱ्या शांताबाई नगिन राठोड (७०) रविवारी रात्री काही सामान आणण्यासाठी खारेगाव मच्छी मार्केट परिसरात आल्या होत्या. यावेळी महापालिकेची ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी रस्त्याच्या कडेला खणलेल्या खड्डय़ात त्या पाय घसरुन पडल्या.  हा खड्डा दहा फूट खोल होता आणि त्यात अडीच फूट पाणी असल्याने शांताबाईंचे तोंड पाण्यात बुडाले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
    कळवा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून वृध्देचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. सखोल तपास करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे. व्ही.बाबर यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा