ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गाजवळील कॅडबरी जंक्शन भागात गुरूवारी सकाळी मेट्रो निर्माणाच्या कामाचा लोखंडी पत्रा अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाला. राबोडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून माहिती घेण्याचा काम सुरू आहे. ठाण्यात वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो चारच्या मार्गिकेचे काम सुरू आहे.
व्हिडिओ ::
गर्डरच्या सपोर्टसाठी खड्ड्यात ही प्लेट लावण्यात आली होती. गुरूवारी सकाळी परिसरातून एक महिला जात असताना अचानक लोखंडी पत्रा महिलेच्या अंगावर पडला. सुनीता कांबळे (३७) मृत महिलेचे नाव आहे. त्यात महिलेचा मृत्यू झाला. राबोडी पोलीसांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.