डोंबिवली: एका रिक्षा चालकाने भरधाव वेगाने तळोजा रस्त्यावर बुधवारी निष्काळजीपणे रिक्षा चालवली. गतिरोधक आला तरी रिक्षा चालकाने ब्रेक न लावल्याने रिक्षात बसलेली एक महिला प्रवासी रिक्षा गतीरोधकावर जोरदार आपटल्याने रिक्षेतून बाहेर फेकून रस्त्यावर पडली. या महिलेला साहाय्यक करण्याऐवजी रिक्षा चालक घटनास्थळावरुन पळून गेला.

या महिलेच्या हात, पाय, डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. मोहिनी जाधव असे जखमी महिला प्रवाशाचे नाव आहे. त्या आडिवली ढोकळी भागात राहतात. बुधावरी दुपारी त्या एका रिक्षेने तळोजा रस्त्याने पलावा प्रवेशव्दार क्रमांक तीनवरुन रिक्षेतून नोकरीच्या ठिकाणी चालल्या होत्या. या प्रवेशव्दारासमोर गतिरोधक आहे हे माहिती असुनही रिक्षा चालकाने गतिरोधका जवळ ब्रेक लावले नाहीत. त्यामुळे भरधाव रिक्षा गतिरोधकावरुन जात असताना जोराने आपटली. रिक्षेत बसलेली महिला प्रवासी रिक्षेच्या दरवाजातून बाहेर फेकली गेली.

Woman dies after falling off her bike in Kondhwa Pune news
कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Viral video shows car hitting woman distracted by phone the Internet is stunned by what she does next
फोनमध्ये पाहत रस्ता ओलांडते महिला, कारने दिली जोरदार टक्कर अन्…, थरारक अपघाताचा Video Viral
Crime case against the couple, couple pushed traffic police, traffic police,
वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा, कारवाई टाळण्यासाठी बनावट वाहन क्रमांकाची पाटी
Ganja smuggling near Mohol, Solapur, Ganja,
सोलापूर : मोहोळजवळ गांजाची तस्करी; दोन महिलांसह चौघे अटकेत
woman overcomes rare disorder of painful meningioma
वेदनादायी मेनिन्जिओमाच्या दुर्मीळ विकारावर महिलेची मात!
malad east man died after struck by Electric shock
विजेचा धक्का लागून नाल्यात पडला, मालाड मधील दुर्घटनेत एकाचा मृत्यू

हेही वाचा >>> खड्ड्यांना जबाबदार ठेकेदार-अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांची मागणी

अचानक बाहेर फेकल्याने मोहिनी यांना गंभीर दुखापत झाली. त्या मदतीचा धावा करत असताना रिक्षा चालकाने त्यांना रुग्णालयात किंवा त्यांना घरी पोहचविण्यासाठी साहा्य्य न करता घटनास्थळावरुन तो पळून गेला. मोहिनी या रुग्णालयात दाखल झाल्यामुळे मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास त्यांना उशीर झाला. अनोळखी रिक्षा चालकाविरुध्द मोहिनी यांनी तक्रार केली आहे. पोलीस उपनिरीक्षक विद्या लांडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.