लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : येथील पश्चिम रेल्वे स्थानक भागातील तृप्ती लॉजमध्ये एका महिलेचा मृतदेह रविवारी सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेसोबत आलेला एक इसम हत्या केल्यानंतर फरार झाला आहे. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस या फरार इसमाचा शोध घेत आहेत.

ज्योती तोरडमल असे मयत महिलेचे नाव आहे. ती घाटकोपर येथील रहिवासी आहे. भूपेद्र गिरी हा इसम शनिवारी दुपारी ज्योतीला घेऊन तृप्ती लॉज मध्ये आला होता. या कालावधीत गिरीने ज्योतीची हत्या केली. शनिवारी रात्री गिरीने लॉज व्यवस्थापकाला मी बाजारातून काही सामान घेऊन येत आहे, असे कारण देत लॉजमधून फरार झाला. रविवारी सकाळी गिरी राहत असलेल्या लॉजचा दरवाजा कर्मचारी ठोठावत होते. आतून काही प्रतिसाद मिळत नव्हता. कर्मचाऱ्यांनी दरवाजाची आतील कडी तोडून खोलीत प्रवेश केला. त्यांना ज्योतीचा मृतदेह बिछान्यावर पडला असल्याचे दिसले. खोलीत तिचा सोबत भूपेंद्र नसल्याचे आढळले.

आणखी वाचा-पायी अयोध्येला जाणाऱ्या रामभक्तांना मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा कंदील

पोलिसांनी तातडीने दोन तपास पथके तयार करून गिरीचा शोध सुरू केला आहे. त्याच्या अटकेनंतर या खुनाचे कारण समजेल असे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader