कल्याण : मुंबईहून कल्याणला एका एक्सप्रेसने येत असताना एका २३ वर्षाच्या नोकरदार व्यक्तिने एका २२ वर्षाच्या महिला साॅफ्टवेअर डेव्हलपरचा गर्दीचा गैरफायदा घेत विनयभंग केला. या महिलेने या व्यक्तिला जाब विचारून ही माहिती तात्काळ रेल्वे पोलिसांना दिली. पोलिसांनी या महिलेच्या तक्रारीवरून संबंधित व्यक्ति विरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तक्रारदार महिला कल्याण परिसरात राहतात. त्या साॅफ्टवेअर डेव्हलपर आहेत. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यातील पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की संबंधित तक्रारदार महिला चार दिवसापूर्वी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान एका एक्सप्रेसने मुंबईहून कल्याणच्या दिशेने येत होत्या. एक्सप्रेसमध्ये गर्दी होती. बसण्यास जागा न मिळाल्याने त्या एक्सप्रेसमध्ये उभ्या राहून प्रवास करत होत्या. यावेळी त्यांच्या बाजुला एक २३ वर्षाची व्यक्ति उभी होती.

हे ही वाचा… दिवा रेल्वे पादचारी पुलावरील गर्दीचा ताण कमी होणार! ;मध्य रेल्वेकडून पुलाच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात

ही व्यक्ति या महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न करत होती. या महिलेने वाद नको म्हणून सुरूवातीला त्या व्यक्तिपासून बाजुला उभे राहण्याचा प्रयत्न केला. पण, कल्याण रेल्वे स्थानक येण्यापूर्वी संबंधित व्यक्तिने महिलेच्या अगदी जवळ येऊन अश्लिल कृत्य करून तिचा विनयभंग केला. गर्दीमध्ये इतर प्रवाशांसमोर हा प्रकार या व्यक्तिने केल्याने तक्रारदार महिला संतप्त झाली. तिने या प्रकाराची माहिती तातडीने रेल्वे पोलिसांना दिली.

हे ही वाचा… ठाणे आणि भिवंडी शहरातील अंतर कमी होणार; कासारवडवली ते खारबाव खाडीपुलासह जोडरस्ता प्रकल्पाची आखणी

या महिलेने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित व्यक्ति विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी त्या व्यक्तिची ओळख पटवून त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला. संबंधित २३ वर्षाची व्यक्ति नोकरदार आहे. ही व्यक्ति कल्याण पश्चिमेतील बारदान गल्ली भागात राहते. लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खोंडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांच्या नेतृत्वाखाली तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman molested in express at night near kalyan railway station asj