डोंबिवली– डोंबिवली रेल्वे स्थानकात गुरुवारी एका महिला तिकीट तपासणीसासह मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांना धक्काबुक्की, दुखापत करणाऱ्या एक महिला प्रवासी आणि तिच्या दोन भावांना डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. रेल्वे न्यायालयाने त्यांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

टिटवाळा जवळील घोटसई रस्त्यावरील इंदिरानगर मधील ओम साई चाळीत हे कुटुंब राहते. शशी विश्वदेव पांडे (२७, महिला प्रवासी), तिचे भाऊ नितीन विश्वदेव पांडे (२१), सर्वेश (३०) अशी अटक आरोपींची नावे आहेत. महिला पोलीस कर्मचारी बांगर आणि महिला तिकीट तपासणीच्या तक्रारीवरुन या तिघां विरुध्द डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> अहमदनगर मार्गाचा कंत्राटदार बदलणार; विद्यमान कंपनीकडून दुसऱ्या कंपनीला जबाबदारी, नागरिकांच्या आंदोलनाला यश

पोलिसांनी सांगितले, शशी पांडे ही महिला गुरुवारी व्दितीय श्रेणीचे तिकीट काढून प्रथम श्रेणीच्या डब्यातून प्रवास करत होती. डोंबिवली रेल्वे स्थानकात महिला तिकीट तपासणीसाने शशी यांच्याकडे तिकीटाची मागणी केली तेव्हा त्यांच्याकडे व्दितीय श्रेणीचे तिकीट आढळून आले. रेल्वे कायद्याने हा गुन्हा असल्याने तिकीट तपासणीसाने या महिलेला दंड भरण्याचा आग्रह केला. यावेळी शशी यांनी तपासणीस महिलेशी हुज्जत घालून दंड भरण्यास नकार दिला. ती आरडाओरडा करुन तेथून निघून जाण्याचा प्रयत्न करू लागली.

तपासणीसाने तिला लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणले. तेथेही ती तपासणी बरोबर वाद घालत होती. प्रवासी महिला शशी हिने आपल्या दोन भावांना डोंबिवली रेल्वे स्थानकात बोलावून घेतले. ते आल्यानंतर तिघांनी मिळून महिला तिकीट तपासणीसाशी पुन्हा वाद घातला. आम्ही दंड रक्कम भरणार नाही असा या तिघांचा आक्रमक पवित्रा होता. तपासणीसाला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न तिघांनी केला. हा वाद सोडविण्यासाठी महिला पोलीस, अधिकारी मध्ये पडले. त्यांनाही तिघांनी मिळून धक्काबुक्की केली. पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीत दुखापत झाली. सरकारी कामात अडथळा आणल्याने महिला पोलीस कर्मचारी बांगर यांनी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीवरुन तात्काळ तिघांना अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने या प्रकरणाचा तपास करत आहेत.