कल्याण – येथील पूर्व भागातील नेतिवली परिसरात राहत असलेल्या एका महिला पोलिसाला गुरुवारी मध्यरात्री तिच्या दिराने घरात बेदम मारहाण करत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात महिला पोलिसाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या महिला पोलिसाने कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, आपण कल्याण पूर्वेत सासु, सासरे, पती, दीर, नणंद आणी जाऊ आणि आमची मुले यांच्यासह एकत्रित कुटुंब पध्दतीने राहतो. महिला पोलीस मुंबई पोलीस दलात सेवेत आहे. या महिलेचा पती वाहतूकदार म्हणून व्यवसाय करतो.

हेही वाचा >>> कल्याण पूर्वेत ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला पोलिसांची नोटीस

गुरुवारी मध्यरात्री एक वाजताच्या दरम्यान महिला पोलिसाचे पती हे त्यांच्या कामानिमित्त बाहेर गेले. त्यावेळी महिला पोलिसाचा दीर हा महिला पोलिसाच्या शय्या खोलीत आला. त्यांनी शिवीगाळ करत महिला पोलिसाची छाती जोराने दाबली. तक्रारदार महिलेने ओरडा करताच अन्य शय्या खोलीत असलेल्या तिची नणंद, जाऊ या घटना घडल्याच्या खोलीत आल्या. त्यावेळी महिलेचा दीर तिला अश्लिल शिवीगाळ करत होता. महिला पोलिसाला मदत करण्याऐवजी नणंद, जाऊने दिराला मदत करण्यासाठी महिला पोलिसाचे हात पकडून ठेवले.

हेही वाचा >>> ठाकरे गटाचा माजी आमदार शिंदे गटात; उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का

यावेळी दिराने महिला पोलिसाच्या पाय, पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा प्रकार सुरू असतानाच तक्रारदार महिलेचा पती बाहेरून घरी परतला. त्यांनी मारहाण करणाऱ्यांच्या तावडीतून पत्नीची सुटका केली. पीडित महिलेने घरात घडत असलेला प्रकार पतीला सांगितला. घरात एकटी असताना दीर आपली ओढणी, झगा ओढण्याचा प्रयत्न करून छेड काढण्याचा प्रयत्न करत असतो. हा प्रकार ऐकून संतप्त पतीने आपल्या भावाच्या कानशिलात चापटी मारल्या. घडल्या प्रकाराबद्दल महिला पोलिसाने जाऊ, नणंद आणि दिराविरुध्द तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Story img Loader