कल्याण- आंबिवली जवळील इराणी वस्तीमधून खडकपाडा पोलिसांनी एम. डी. चरस विकणाऱ्या एका महिलेला अटक केली. सबा सय्यद असे या महिलेचे नाव आहे. इराणी वस्तीमधील एक महिला आंबिवली, मोहने परिसरात एम. डी. चरस विकत असल्याची माहिती खडकपाडा पोलिसांनी मिळाली होती. पोलिसांनी या महिलेवर पाळत ठेऊन तिला इराणी वस्तीमधून मंगळवारी अटक केली. तिच्याकडे एम. डी. चरसचा साठा आढळून आला. ती चरस कोठुन आणत होती. ती कोणाला विकत होती याचा तपास पोलीस करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman selling charas arrested from ambivali zws