लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ठाणे : प्रेमसंबंधास नकार दिल्याने २५ वर्षीय विवाहितेला रॉकेल अंगावर ओतून जिवंत जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी सुनिजर वर्मा आणि त्यांचा मित्र रमेश वर्मा या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

भिवंडी येथील अंजुरफाटा भागात पिडीत २५ वर्षीय महिला राहत होती. ती विवाहित होती. तरीही तिचे सुनिजर याच्यासोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी तिचा त्याच्यासोबत वाद झाला. यातून तिने प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. त्यानंतरही सुनिजर तिला त्रास देत होता. १९ ऑक्टोबरला ती घरामध्ये एकटी होती. त्यावेळी सुनिजर आणि त्याचा मित्र रमेश हे दोघे घरात शिरले आणि त्यांनी तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जाळले. पेटलेल्या अवस्थेत ती बाहेर आली. नागरिकांनी आग विजवून तिला रुग्णालयात दाखल केले.

आणखी वाचा-डोंबिवलीतील २७ गावांमध्ये काकाचा पुतणीवर वर्षभर लैंगिक अत्याचार

याबाबत माहिती मिळाल्यानंतर नारपोली पोलिसांनी रुग्णालयात तिचा जबाब नोंदवून घेतला होता. त्याआधारे पोलिसांनी सुनिजर आणि रमेश या दोघांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी सुनिजर आणि रमेश यांना अटकही केली. दरम्यान, उपचारादम्यान मंगळवारी या महिलेचा मृत्यु झाला. यानंतर पोलिसांनी दोघांवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.