ठाकुर्ली मधील एका जवाहिऱ्याने याच भागात राहत असलेल्या चार महिलांना तुम्ही माझ्याकडे दागिने गहाण ठेवा त्यावर मी तुम्हाला कर्ज देतो. तसेच काही महिलांकडून दागिने घडविण्यासाठी आगाऊ पैसे घेतले. या महिलांकडून दागिने ताब्यात आल्यावर वर्षभरात त्यांना कर्ज आणि दागिने नाहीच, पण मूळ ऐवज, रक्कम परत न केल्याने या महिलांनी जवाहिऱ्या विरुध्द ११ लाख ५९ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> डोंबिवली रेल्वे स्थानक भागात पाकीट चोराला वाहतूक पोलिसांनी पकडले

मिनू प्रमोद गांधी (५३,रा. कृपा साईधाम सोसायटी, नवीन हनुमान मंदिराजवळ, ठाकुर्ली पूर्व) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. मिनू यांच्यासह रंजना मिलिंद निकाळे (५६), जयश्री नीलेश श्रीराम (३७), पुनम राजेश सिंह (३०) अशी फसवणूक झालेल्या महिलांची नावे आहेत. या महिला ठाकुर्ली भागात राहतात.

सोहनसिंह चैनसिंह धसाना (५०, रा. महालक्ष्मी ज्वेलर्स, अंकीता नगरी सोसायटी, ठाकुर्ली पूर्व) असे आरोपी जवाहिऱ्याचे नाव आहे. जून २०२१ ते जून २०२२ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.

हेही वाचा >>> पोलिसांच्या उपद्रवाने कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टर हैराण ; भौगोलिक हद्दी शोधण्याचे डॉक्टरांना काम

पोलिसांनी सांगितले, मिनू गांधी यांच्यासह फसवणूक झालेल्या इतर तीन महिलांना जवाहिर सोहनसिंह याने गेल्या वर्षी तुम्ही माझ्याकडे दागिने गहाण ठेवा त्या दागिन्यांच्या किमतीप्रमाणे मी तुम्हाला कर्ज देतो असे सांगितले. तर काही महिलांना मी तुमचे दागिने घडवून देतो. त्या बदल्यात काही रक्कम आगाऊ घेतली. या महिलांचा विश्वास संपादन करुन त्याने हा घोटाळा केला होता. वर्ष होत आले तरी आपणास कर्ज नाहीच, घडणावळीचे दागिने मिळत नाहीत म्हणून या महिलांनी सोहनसिंह याच्याकडे दागिने परत करण्याची, पैसे परत देण्याची मागणी सुरू केली. सुरुवातीला सोहनसिंह याने तुम्हाला कर्ज, दागिने देतो असे सांगून वेळकाढूपणा सुरू केला. वारंवार त्याची साचेबद्ध् उत्तरे ऐकून महिला संतप्त झाल्या. सोहनसिंह त्यांना उलट उत्तरे देऊ लागला. सोहनसिंह आपणास कर्ज नाहीच पण आपली मूळ रक्कमही परत करत नाही हे लक्षात आल्यावर चारही महिलांनी रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन जवाहिर सोहनसिंह धसाना विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. उपनिरीक्षक के. पी. वाडकर या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women cheated of rs 11 lakh by jewellers in thakurli zws