समाजात महिलांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान मिळण्याबरोबरच त्यांनी केलेल्या कार्याची पोचपावती मिळणे आवश्यक असते. त्यांच्या कार्याची यथोचित दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्याच्या उद्देशाने भिवंडीतील जी.एम. मोमीन महिला महाविद्यालयाच्या वतीने एका पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी महिला दिनाचे औचित्य साधून समाजात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘वुमन्स अचिव्हर ऑफ ठाणे डिस्ट्रिक्ट’ या सन्मानाने गौरवण्यात येणार आहे.
समाजसेवा, शिक्षण तसेच समाजातील विशेष योगदानासाठी ठाणे जिल्ह्य़ातील महिलांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. भिवंडी येथील जी. एम. मोमीन महिला महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. या पुरस्कारासाठी विविध सामाजिक संस्थांतर्फे महिलांचे नामांकन करण्यात येणार आहे. प्रत्येक विजेत्या महिलेला स्मृतिचिन्ह व पंचवीस हजार रुपयांचे रोख बक्षीस के.ई.एम. सोसायटीमार्फत देण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी मान्यवर समाजसेवक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रा. अनिस चौधरी यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा