कल्याण- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बुधवारी कल्याण, डोंबिवली शहरातील विविध सरकारी कार्यालये, पालिका कार्यालये, पोलीस ठाणी, महाविद्यालयांमध्ये महिला दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी कर्तृत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला.
कल्याण तालुक्यातील गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, माजी सभापती स्वरा चौधरी, उपप्राचार्य हरिष सोष्टे यांच्या उपस्थितीत महाविद्यालयातील महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. जिजाऊ, बहिणाबाई चौधरी, सावित्रीबाई फुले यांचा आदर्श समोर ठेऊन महिलांनी कार्य करावे, असे अध्यक्ष घोडविंदे म्हणाले. प्रा. जया देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.
हेही वाचा >>> बदलापूर : वन्यजीवांचे अपघात रोखण्यासाठी फर्क अभियान; वन्यजीवांचे रस्त्यांवरील अपघात क्षेत्र शोधण्याची मोहिम
कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे आचार्य अत्रे रंगमंदिरात विविध क्षेत्रातील कर्तृत्वावान महिलांना सन्मान करण्यात आला. अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी असलेल्या डोंबिवलीतील गणेश मंदिराच्या अध्यक्षा व प्रवचनकार अलका मुतालिक, पर्यावरणप्रेमी रुपाली शाईवाले यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी उपायुक्त अर्चना दिवे, साहाय्यक संचालक नगररचना दिशा सावंत, जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर, सविता हिले, उपअभियंता रोहिणी लोकरे, उपायुक्त स्वाती देशपांडे उपस्थित होते.
हेही वाचा >>> शासकीय निधीच्या प्रतीक्षेत ठाणे, कल्याण-डोंबिवली पालिकेचे अर्थसंकल्प?
साकेत ज्ञानपीठतर्फे कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस, अधिकाऱ्यांचा सन्मान प्राचार्य डाॅ. वसंत बऱ्हाटे, डाॅ. सनोज कुमार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख, गवळी, प्रा. संजय चौधरी, प्रा. प्रिया नेर्लेकर, सुधा नायर, प्रसुणा बिजू उपस्थित होते.
रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे डोंबिवलीतील महिला रिक्षा चालक, महिला पत्रकारांचा सन्मान संघटनेचे पदाधिकारी अंकुश म्हात्रे, शेखर जोशी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या उपस्थित करण्यात आला.