लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : भिवंडीतील ब्राह्मणआळी भागात असलेल्या एका सराफाच्या दुकानात बुरखा घातलेल्या दोन महिला दागीने पाहण्याच्या बहाण्याने आल्या आणि त्यांनी दुकानातील कर्मचाऱ्याची दिशाभूल करत आठ लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

case registered against person who stole jewellery of dead woman in kurla bus accident case
कुर्ला बस अपघात: मृत महिलेचे दागिने चोरणाऱ्याविरोधात अखेर गुन्हा दाखल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Anti corruption department filed case against Wangani Sarpanch Vanita Adhav for demanding bribe
लाच मागितल्याने महिला सरपंचावर गुन्हा, बदलापूर जवळच्या वांगणी ग्रामपंचायतीतील प्रकार
fake Goods Market Pune, fake Goods, Market Pune,
शहरबात… बनावट मालाच्या बाजारपेठांना रोखणार कोण?
ED quiz actress Gehena Vasisth in financial fraud probe
अभिनेत्री गहना वशिष्ठची ईडीकडून चौकशी
bmc to rehabilitate fisherwomen in tardeo
मासळी विक्रेत्या महिलांचे पुनर्वसन होणार ? पालिका अधिकाऱ्यांची मासळी विक्रेत्या महिलांसह बैठकीत चर्चा
woman, dance bar, Dubai, stage show,
स्टेज शो करण्याच्या नावाखाली महिलेला डान्सबारच्या कामात ढकलले, पोलिसांच्या मदतीने महिलेची दुबईतून सुखरूप सुटका
Thief arrested, Thief arrested for stealing in Mumbai,
साधकाच्या वेशात चोरी करणारा चोरटा गजाआड; पुणे, पिंपरीसह मुंबईत वाईत चोरीचे गुन्हे

आणखी वाचा-डोंबिवली जीमखाना रस्त्यावरील वस्तीमध्ये तीव्र पाणी टंचाई, रहिवाशांचे डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात ठिय्या आंदोलन

भिवंडीत ब्राह्मणआळी भागात मंछालाल जसाजी चौहान (५२) यांचे स्वत:चे सोन्याच्या दागिन्याचे दुकान आहे. या दुकानात सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास काळ्या रंगाचा बुरखा घातलेल्या दोन अज्ञात महिला सोन्याचे दागिने पाहण्याच्या बहाण्याने आल्या होत्या. दुकानातील कर्मचारी भगवानराम हा त्या महिलांना दागिने दाखवत होता. परंतू, या महिलांनी भगवानराम या कर्मचाऱ्याची दिशाभूल करत, एका ट्रे मधील आठ लाख रुपये किंमतीचे २०० नग सोन्याचे दागिने लबाडीने चोरी केले. याप्रकरणी मंछालाल जसाजी चौहान यांनी या दोन महिलांविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीवरुन या महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीसांचा पुढील तपास सुरु आहे.

Story img Loader